नाशिक : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जयंतीनिमित्त मालेगाव येथे 'शाश्वत शेती दिन' साजरा करण्यात आला. या निमित्ताने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच जीवामृताचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
कृषि विज्ञान संकुल येथील शास्त्रज्ञ डॉ. हर्षवर्धन मरकड यांनी डाळिंबावरील तेलकट डाग व मर रोग नियंत्रणासाठी जीवामृत तयार करण्याची पद्धत सांगितली. त्यासाठी २०० लिटर पाणी, १० 3 किलो गाईचे शेण, १० लिटर गोमूत्र, २ किलो डाळीचे पीठ, २ किलो गूळ वापरावा.
वडाच्या मुळांजवळील माती वापरून ५ ते ७ दिवस सावलीत ठेवावे व दररोज दोन वेळा ढवळावे. तयार झालेले मिश्रण ठिबक 3 सिंचनाद्वारे किंवा फवारणी करून वापरता येते. यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब व सूक्ष्मजीवांची वाढ होते, जी शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी शाश्वत शेती, जैविक निविष्ठा यावर मार्गदर्शन करताना, आत्मा अंतर्गत 'क्षेत्रीय किसान गोष्टी' उपक्रमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर चर्चा करून शंका समाधान केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी येथे सवलतीच्या दरात जैविक निविष्ठा उपलब्ध असल्याची माहिती देत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
नवीन विहिरीपासून ते विविध अवजारांपर्यंत अनुदान, काय आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना?