Jamun Benefits : कधीकाळी गावागावांत सहजपणे सापडणाऱ्या गावरान जांभळाच्या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. वाढती वृक्षतोड, शहरीकरण आणि लोकांचा पारंपरिक वृक्षांकडे होणारा दुर्लक्ष यामुळे ग्रामीण भागातही आता पिकलं जांभूळ दुर्मीळ झालं आहे. (Jamun Benefits)
बाजारात याचे दर थेट १५० ते २०० किलोपर्यंत पोहोचले असून, या औषधी गुणधर्म असलेल्या फळाचं आता बाजारमूल्य वाढलं असलं तरी त्याचं अस्तित्व मात्र कमी होत चाललं आहे. (Jamun Benefits)
जांभळाची गोडसर चव आणि औषधी गुणधर्मांनी भरलेलं असं एक फळ, जे फक्त खाण्यास स्वादिष्ट नाही तर अनेक आजारांपासूनही संरक्षण देतं.
मधुमेह, पचनदोष, हृदयविकार, त्वचासंवर्धन आणि वजन नियंत्रण यासाठी जांभूळ एक उत्तम नैसर्गिक उपाय मानला जातो. मात्र, जांभळाचं उत्पादन झपाट्याने कमी होत असल्याने या औषधी फळाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. पण या फळाचा उपयोग केवळ खाण्यासाठी नाही, तर आरोग्यसंपन्न आयुष्य राखण्यासाठी होतो.
लावणीच्या जांभळाला मागणी पूर्वी पारंपरिक गावरान जांभळीची झाडं गावागावात आढळायची. मात्र, ती झाडं आता जवळपास नामशेष झाली असून, काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात लावणीची (कलम केलेली) झाडं लावली आहेत. ही फळं अधिक टपोरी, गोड आणि बाजारात सहज उपलब्ध होत असल्याने त्यांना अधिक मागणी असते.
जांभूळाचे आरोग्यदायी फायदे
मधुमेह नियंत्रणात मदत : जांभळातील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेहग्रस्तांसाठी हा नैसर्गिक उपाय आहे.
पचनक्रिया सुधारते : यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास उपयोगी ठरते.
रोगप्रतिकार शक्ती वाढवते : अँटीऑक्सिडंट्सने (Antioxidants) भरपूर जांभूळ रोगप्रतिकारशक्ती बळकट करते आणि आजारांपासून संरक्षण देते.
हृदयासाठी फायदेशीर : यामध्ये असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) हृदयाचे आरोग्य राखतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात.
वजन कमी करण्यास मदत : कमी कॅलरीज आणि अधिक फायबरयुक्त असल्यामुळे हे वजन नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतं.
रक्त शुद्ध करते : जांभूळ रक्तातील विषारी घटक बाहेर टाकून शुद्धीकरणात मदत करते.
त्वचेसाठी उत्तम : व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे (Antioxidants) त्वचेला उजळ, निरोगी ठेवण्यात मदत करते.
दृष्टीसाठी फायदेशीर : डोळ्यांसाठी उपयुक्त असल्यामुळे दृष्टी टिकवण्यासाठी याचा वापर होतो.
उपाशी पोटी जांभूळ खाल्ल्यास काहींना पोटदुखी किंवा गॅस (Gas) होण्याची शक्यता असते. याशिवाय, जांभूळ आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र खाणं टाळावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
जांभूळ हे केवळ एक फळ नसून, आरोग्याचा नैसर्गिक खजिना आहे. त्याचे संवर्धन आणि योग्य वापर हाच आपल्या आरोग्याचा खरा रक्षणकर्ता आहे.
हे ही वाचा सविस्तर : Chia Seeds: चिया बियांचे असे आहेत चमत्कारी फायदे वाचा सविस्तर