आज घर घेणं म्हणजे अगदी स्वप्नवत गोष्ट झाली आहे. अलीकडच्या काळात एखादं दोन गुंठे जमीन घेऊन घर उभं केलं जात. मात्र खरचं गुंठ्यांवर जमीन विकत घेणे कायदेशीर आहे का? आणि त्या जमिनीवर घर बांधणे कायदेशीर आहे का? या गोष्टी थोडक्यात समजून घेऊयात...
सर्वप्रथम गुंठेवारी म्हणजे काय, हे पाहुयात.
गुंठेवारी म्हणजे शेतीची जमीन निवासी वापरासाठी लहान भूखंडांमध्ये विभागून विकणे, जे अनेकदा अनधिकृत असते. हे नियम आणि परवानग्यांशिवाय केले जाते, ज्यामुळे त्यात अनेक कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी असू शकतात. हा प्लॉट साधारण NA नसतो, लेआउट मंजूर नसतो, त्यामुळे तो कायदेशीर नसतो. शिवाय २०१५ पासून महाराष्ट्र शासनाने गुंठेवारी प्लॉट विक्री बेकायदेशीर घोषित केली आहे. याचा अर्थः गुंठेवारी प्लॉट खरेदी-विक्री कायदेशीर नाही.
या प्लॉटवर घर बांधणं कितपत योग्य?
NA Order नसल्यास कोणतेही बांधकाम अनधिकृत ठरते. नगरपालिका/पंचायत / तहसील येथून नोटीस येऊ शकते. कारण नोंदणी झाली तरीही प्लॉट कायदेशीर होत नाही. भविष्यात पाडकामाची नोटीस येऊ शकते. बँक कर्ज देत नाही. पाणी/वीज कनेक्शन मिळण्यात अडचणी. संबंधित सातबाऱ्यावर वर तुमचे नाव जात नाही (किंवा प्लॉट नंबर दिसत नाही). तसेच पुनर्विक्री करणे खूप अवघड होऊन बसते.
फक्त जुन्या बांधकामांना नियमितीकरण
२०२५ पूर्वीची काही बांधकामे नियमांनुसार regularise झाली. नवीन बांधकाम (2021-2025) regularise होत नाही. त्यामुळे गुंठेवारी प्लॉट घेणे म्हणजे भविष्यात मोठा धोका समजला जातो.
गुंठेवारी प्लॉट कायदेशीर करण्यात एकच मार्ग
NA (Non-Agricultural) Conversion मिळवणे, जिल्हाधिकाऱ्यांकडून NA ऑर्डर मिळवणे, Town Planning Approval, Approved Layout इत्यादी गोष्टी मिळवाव्या लागतात. त्यांनंतरच प्लॉट कायदेशीर होतो.
गुंठेवारी विक्रेते कशी फसवणूक करतात?
नोंदणी झाली की प्लॉट कायदेशीर होतो, लवकरच NA होणार, सरकार Regularisation करणार आहे, ही जमीन ग्रीन झोनच्या बाहेर आहे. महानगरपालिकेत नाव ट्रान्स्फर होईल, अशा बाबी सांगून फसवणूक केली जाते.
