Jamin Kharedi : आजकाल प्रत्येकजण आपल्याकडे शेत किंवा जमीन (Shet Jamin Kharedi) असायला हवी, यासाठी प्रयत्न करतो आहे. कारण जमिनीचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहेत. जर तुमच्याकडे जमीन नाही किंवा त्याबाबत माहिती नाही, आणि जर या जमिनीच्या बाबत एखादी नोंद सापडली तर ती जमीन तुमच्या नावे सातबाऱ्यावर येऊ शकते, हो हे शक्य आहे, कसं ते तुम्हाला सांगतो.
०१ एप्रिल १९५७ ला जर का तुमच्या वडिलांच्या, आजोबाच्या, पंजोबाच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कुणाच्याही नावावर एखाद्या जमिनीवर कुळ म्हणून त्यांची नोंद लागलेली असेल तर ते त्याच दिवशी जमिनीचे मालक झालेले असतात. फक्त कायद्यात सांगितल्याप्रमाणे कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करणं बाकी राहतं. आता तुम्ही वारसा या नात्याने ती जमीन परत मिळवू शकतात.
कायद्यात सांगितल्याप्रमाणे कलम ३२ (ग) ची प्रक्रिया पूर्ण करून त्याला कलम ३२ (म) नुसार प्रमाणपत्र प्राप्त होईल. ते प्रमाणपत्र तुमच्या नावाचे जमीन ट्रान्सफर झाल्याचं प्रमाणपत्र असेल. असं प्रमाणपत्र तुम्ही तलाठ्याला सर्कलला दाखवून सातबाऱ्यावर तुमच्या नावाने त्या जमिनीची नोंद करून घेऊ शकतात आणि जमिनीचे मालक होऊ शकतात.
काय आहे कलम ३२ (ग)
कलम ३२ (ग) हा मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८ मधील एक महत्वाचा भाग आहे. या कलमाद्वारे, कृषक दिनी (१ एप्रिल १९५७) कुळांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार मिळतो. जर कुळाने या दिवशी जमीन खरेदी केली असेल, तर ती जमीन त्याच्या मालकीची मानली जाते आणि सातबारावर त्याच्या नावावर नोंद होते. ज्या कुळांना त्यावेळी हे शक्य झाले नाही, ते आजही कलम ३२ (ग) नुसार अर्ज करून जमीन खरेदी करू शकतात.
एकाच कुटुंबातील जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीसाठी किती रुपये आकारले जातात?