Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न

हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न

Latest News Intercropping with coriander to control pests in chickpea and pea crops | हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न

हरभरा, वाटाणा पिकाचे कोथिंबीर पिकाशी भन्नाट कनेक्शन, एका सिजनमध्ये तिप्पट उत्पन्न

Agriculture News : किडीचा बंदोबस्त करण्यासाठी "कोथिंबीर" (धने) या पिकाचा आंतरपीक म्हणून प्रभावी वापर केला जात आहे.

Agriculture News : किडीचा बंदोबस्त करण्यासाठी "कोथिंबीर" (धने) या पिकाचा आंतरपीक म्हणून प्रभावी वापर केला जात आहे.

- रतन लांडगे 

Agriculture News :  शेतीमध्ये रासायनिक कीडनाशकांचा वाढता वापर आणि त्यावरील खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असतानाच, चौरास भागातील प्रगतशील शेतकऱ्यांनी एक नैसर्गिक आणि किफायतशीर मार्ग शोधला आहे.

हरभरा आणि वाटाणा यांसारख्या पिकांवर पडणाऱ्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आता "कोथिंबीर" (धने) या पिकाचा आंतरपीक म्हणून प्रभावी वापर केला जात आहे.

हरभरा पिकावर घाटा अळीचा प्रादुर्भाव होतो. अळी रोखण्यासाठी शेतकरी हरभऱ्याच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर कोथिंबीरीची पेरणी करत आहेत. कोथिंबीरीच्या फुलांचा विशिष्ट गंध व त्याकडे आकर्षित होणारे मित्रकीटक यामुळे मुख्य पिकावरील शत्रूकिडींचे प्रमाण कमी होते.

असे आहेत फायदे
औषधांच्या खर्चात मोठी बचत :
कीड नियंत्रणासाठी महागड्या रासायनिकाची गरज नसल्याने उत्पादन खर्चात घट.
जमिनीचा पोत सुधारतो : आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि विविध पिकांच्या मुळांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
अतिरिक्त उत्पन्न : कोथिंबीरीच्या उत्पादनात शेतकऱ्यांना नफा मिळत आहे
पर्यावरणपूरक शेती : रासायनिक विषारी अंशांशिवाय सकस पीक उत्पादित होत आरोग्यासाठी फायदेशीर. वाटाणा पिकातही कोथिंबीरीचा आंतरपीक म्हणून वापर यशस्वी.

हरभऱ्याला जास्त कीड लागते, पण मध्येच कोथिंबिरीची पेरणी केल्याने नैसर्गिकरीत्या कीड कमी होते. फवारणीचा खर्च वाचला असून, जमिनीची सुपीकता वाढतेय.
- मधुकर जगझापे, शेतकरी, वलनी.

 

कमी खर्चात दररोजचा नफा देणारा मिनी बेसन मिलचा व्यवसाय, पहा व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती

Web Title : चना, मटर की फसल का अनूठा संबंध: धनिया से तिगुना उत्पादन!

Web Summary : चौरास के किसान प्राकृतिक रूप से कीटों से निपटने के लिए चने और मटर के साथ धनिया की सह-फसल उगा रहे हैं। इससे कीटनाशक का खर्च कम होता है, मिट्टी की गुणवत्ता में सुधार होता है और मुनाफा बढ़ता है, जिससे पर्यावरण के अनुकूल कृषि पद्धतियों को बढ़ावा मिलता है। किसानों को तिगुना उत्पादन मिल रहा है।

Web Title : Chickpea, Pea Crop's Unique Connection: Triple Yield with Coriander!

Web Summary : Farmers in Chauras are intercropping coriander with chickpeas and peas to combat pests naturally. This reduces pesticide costs, improves soil quality, and increases profits, promoting eco-friendly farming practices. Farmers are achieving triple yields.