जळगाव : वडगाव बुद्रूक येथील शेतकरी भय्यासाहेब राजपूत यांनी पपई पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड करत चांगले उत्पादन घेतले; मात्र बाजारभाव घसरल्याने अपेक्षित उत्पन्नावर पाणी फिरले आहे.
राजपूत यांनी ३ एकर क्षेत्रात १० जानेवारी २०२६ रोजी पपई पिकाची लागवड केली. त्याच पिकात २० जानेवारी रोजी टरबुजाचे आंतरपीक घेतले. टरबुजाचे फळ चांगले आकारले असून, दोनच तोड्यांत एकूण ६६ टन उत्पादन मिळाले.
मात्र, बाजारात टरबुजाला ८ रुपये प्रतिकिलो असा कमी भाव मिळाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. या उत्पादनातून ५ लाख १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर पपई वा टरबूजवर २ लाख १० हजार रुपये खर्च झाला होता. खर्च वजा जाता ३ लाख रुपये निव्वळ उत्पन्न हाती आले.
जमीन क्षारपट झाली आहे, सामू वाढला आहे, सुपीकता कशी वाढवायची, हे आहेत पाच सोपे उपाय
