lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > जैविक घटकांचा वापर करा, जमिनीची पोत चांगली ठेवा..

जैविक घटकांचा वापर करा, जमिनीची पोत चांगली ठेवा..

Latest News How to increase soil fertility, read in detail | जैविक घटकांचा वापर करा, जमिनीची पोत चांगली ठेवा..

जैविक घटकांचा वापर करा, जमिनीची पोत चांगली ठेवा..

सद्यस्थितीत शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत चालला आहे.

सद्यस्थितीत शेतीत रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत चालला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सद्यस्थितीत शेतीतरासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येईल, जैविक घटकांचा वापर कसा करता येईल, हे पाहणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना जैविक घटकांचा वापर करून शेती करण्यासाठी मार्गदर्शन तथा प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. 

इगतपुरी तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील बारशिंगवे गावात उपलब्ध पाण्यावर गावातील शेतकरी टोमॅटो, मिरची, वांगे आदी भाजीपाला पिकाची लागवड करतात. या गावातील काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाची करार पद्धतीने लागवड केली आहे. या पिकांसाठी रासायनिक बुरशीनाशके, कीटकनाशके व खते यावर होणारा बेसुमार खर्च तसेच मिरची पिकात मर रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्राध्यापक मंगेश व्यवहारे यांचे मार्गदर्शन व जैविक घटकांची निर्मिती प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, मंडल कृषी अधिकारी भास्कर गीते, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते हे उपस्थित होते. 

प्रा. मंगेश व्यवहारे यांनी शेतीतील जैविक घटक जसे जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके, जैविक खते जसे ट्रायकोडर्मा, स्युडोमोनस नेमुरीया,  अँझोटोबँक्टर आदी जैविक घटकांचे जमिनीतची सुपिकतेसाठीचे महत्त्व विशद केले. या घटकांचे मातृवाण कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेतून आणून यापासून जैविक घटक निर्मिती कशी करायची याबाबत प्रात्यक्षिक दिले. तर कृषी सहाय्यक विजय कापसे यांनी शेतामध्ये जैविक घटक वापरल्याने खर्चात होणाऱ्या बचतीचा ताळेबंद मांडला. 


सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये
मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे.
उत्पादनात वैविध्य
शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
एकमेकाशी निगडित पद्धती
सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Latest News How to increase soil fertility, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.