Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? थेट सरकारला प्रश्न, विधानसभेत काय घडलं? 

विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? थेट सरकारला प्रश्न, विधानसभेत काय घडलं? 

latest News How much is Vidarbha's irrigation backlog question to maharashtra government in vidhansabha | विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? थेट सरकारला प्रश्न, विधानसभेत काय घडलं? 

विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? थेट सरकारला प्रश्न, विधानसभेत काय घडलं? 

Vidarbha Irrigation Backlog : विदर्भाच्या सिंचन अनुशेषाबाबत विधानसभेत दिलेली माहिती गोंधळात टाकणारी आहे, असा....

Vidarbha Irrigation Backlog : विदर्भाच्या सिंचन अनुशेषाबाबत विधानसभेत दिलेली माहिती गोंधळात टाकणारी आहे, असा....

नागपूर : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विदर्भाच्या सिंचन अनुशेषाबाबत विधानसभेत दिलेली माहिती गोंधळात टाकणारी आहे, असा आरोप लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीचे संयोजक अॅड. अविनाश काळे यांनी केला आहे. तसेच, विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका किती आहे, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली आहे.

महाजन यांनी संबंधित माहिती देताना सुरुवातीला जून-२०२५ पर्यंत विदर्भातील ७ लाख ८४ हजार ७२० हेक्टरपैकी ७ लाख ४१ हजार १८५ हेक्टरचा सिंचन अनुशेष भरून काढण्यात आला आहे, असे सांगितले तर, त्यानंतर विदर्भातील ८४ प्रकल्पांची एकूण सिंचनक्षमता १४ लाख ५६ हजार हेक्टर असून जून-२०२५ पर्यंत ७ लाख ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे, असे सांगितले. 

यापैकी पहिली माहिती विचारात घेतली तर, सिंचनाचा अनुशेष केवळ ४३ हजार ५३५ हेक्टर बाकी राहतो आणि दुसऱ्या माहितीनुसार सिंचनाचा अनुशेष ७ लाख २० हजार हेक्टर असल्याचा अर्थ निघतो.

परिणामी, विदर्भाचा सिंचन अनुशेष नेमका आहे तरी किती? असा प्रश्न उपस्थित होतो. सरकारने यावर स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असे काळे यांनी म्हटले आहे.

Web Title : विदर्भ सिंचाई बैकलॉग: सरकारी आंकड़े भ्रमित, विधानसभा में सवाल उठे।

Web Summary : एडवोकेट अविनाश काले ने विदर्भ के सिंचाई बैकलॉग के संबंध में विधानसभा में प्रस्तुत विरोधाभासी आंकड़ों पर सवाल उठाया। विसंगति से आवश्यक सिंचाई की वास्तविक मात्रा के बारे में चिंताएं बढ़ जाती हैं, सरकार से स्पष्टता की मांग की जाती है।

Web Title : Vidarbha Irrigation Backlog: Government Figures Confuse, Questions Raised in Assembly.

Web Summary : Advocate Avinash Kale questions conflicting data presented in the Assembly regarding Vidarbha's irrigation backlog. The discrepancy raises concerns about the actual amount of irrigation needed, demanding clarity from the government.