Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद राहतील, जाणून घ्या सविस्तर 

होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Latest News How many days will market yards remain closed on the occasion of Holi, know in detail | होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद राहतील, जाणून घ्या सविस्तर 

होळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड किती दिवस बंद राहतील, जाणून घ्या सविस्तर 

Holi festival : होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर उपलब्ध नसल्याने लिलाव प्रक्रियेत खंड पडणार आहे.

Holi festival : होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर उपलब्ध नसल्याने लिलाव प्रक्रियेत खंड पडणार आहे.

Holi festival :   होळी-धुळवड सणांच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये मजूर उपलब्ध नसल्याने लिलाव प्रक्रियेत खंड पडणार आहे. रविवारची सुटी आणि त्यानंतर सणांमुळे व्यापारी वर्ग २ ते ४ मार्चदरम्यान लिलावात सहभागी होणार नसल्याने पुढील लिलाव थेट ५ मार्च रोजी होणार आहे. सलग चार ते पाच दिवस लिलाव बंद राहिल्याने त्या दिवशी कांद्यासह इतर शेतमालाची आवक एकाच वेळी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लासलगाव बाजार समितीत १,६४० वाहनांमधून आलेल्या लाल कांद्याचा लिलाव ३०० ते १,२०० दरम्यान झाला असून सरासरी भाव ८०० प्रतिक्विंटल नोंदवला गेला. व्यापारी संचालक प्रवीण कदम आणि बाळासाहेब दराडे यांनी बाजार समितीला दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की, होळी व धुळवड सणामुळे कांदा ग्रेडिंग-पॅकिंगसाठी आवश्यक मजूर उपलब्ध नाहीत. 

रेल्वे रॅक पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने खरेदी केलेला कांदा बाहेर पाठवणे सध्या अशक्य झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग सोमवार (दि. २) ते बुधवार (दि. ४) या कालावधीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नाही. सध्या खरीप (लाल) कांद्याची मोठी आवक सुरू असताना रैंक अपुरे मिळणे, चालक व मनुष्यबळाची कमतरतामुळे काही वेळा रॅक दोन-तीन दिवस एका ठिकाणी उभे राहतात. व्यापाऱ्यांच्या खळ्यात माल साचून राहतो.

नाशिकसह अनेक बाजार समित्या बंद 

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद राहणार आहेत. बाजार समित्यांमधील मजूर सणासाठी बाहेरगावी गेल्याने लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. शिवाय बाजार समिती प्रशासनाने देखील शेतकऱ्यांना लिलाव बंद राहणार असल्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नाशिकसह राज्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत. 

Web Title : होली पर मार्केट यार्ड बंद: विस्तृत कार्यक्रम जानिए

Web Summary : होली के कारण 2-4 मार्च तक बाजार यार्ड बंद रहेंगे क्योंकि मजदूर उपलब्ध नहीं हैं। 5 मार्च को नीलामी फिर से शुरू होगी, जिससे प्याज और अन्य उपज की आवक बढ़ने की संभावना है। रैक की कमी से समस्या बढ़ जाती है, जिससे देरी और उपज का संचय होता है।

Web Title : Market Yard Closed for Holi: Know the Detailed Schedule

Web Summary : Due to Holi, market yards will be closed from March 2-4 as laborers are unavailable. Auctions will resume on March 5, likely increasing the inflow of onions and other produce. Rack shortages exacerbate the issue, causing delays and produce accumulation.