Halad Rope : यंदाच्या खरिपात हळद लागवडीसाठी (Halad Lagvad) परभणी विद्यापीठाकडून यांच्या माध्यमातून हळदीची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हळद सेलम वाणाची ही रोपे असून प्रथा येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. परभणी विद्यापीठाकडून (Parbhani Vidyapith) रोपे खरेदीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षात मराठवाड्यात हळद लागवड वाढली आहे. अनेक शेतकरी सुधारित जातीची लागवड करून उत्पादन घेत आहेत. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या उद्यानविद्या संशोधन योजना (भाजीपाला) विभागाकडून हळदीच्या सेलम वाणाची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
जवळपास दोन लाख रोपे उपलब्ध असून प्रति रोप ३ रुपये दराने विक्री केली जाणार आहे. यासाठी संशोधन अधिकारी डॉ. व्ही. एस. खंदारे यांच्याशी संपर्क साधू शकता. खरेदीसाठी पूर्व नोंदणी केलेले शेतकऱ्यांना ही रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हळद लागवड साधारणपणे जून-जुलै महिन्यात केली जाते, पण तुम्ही रोपे लावत असाल, तर तुम्हाला हवा असलेला कालावधी निवडू शकता.
माफक दरात उपलब्ध
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हळद लागवड (Halad Lagwad) मोठ्या प्रमाणावर केली जाते. सेलम हळद ही एक प्रसिद्ध जात आहे, जी तिच्या उच्च प्रतीसाठी आणि कर्क्युमिन (curcumin) च्या जास्त प्रमाणासाठी ओळखली जाते. विद्यापीठाने या भागातील प्रचलित हळद सेलम या वाणाचे शुद्ध व दर्जेदार बेण्यापासून प्रो ट्रे मध्ये हळदीची रोपे तयार करण्यात आली आहेत.