जळगाव : राज्यात सर्वत्र मसाला पिकांची लागवड (Masala Crop Lagvad) केली जाते. जळगाव जिल्ह्यात हे प्रमाण कमी असले तरी काही तालुक्यांमध्ये मसाला पिकांचे लागवड क्षेत्र वाहत जात आहे. जळगाव जिल्ह्यात हळद, अद्रक, ओवा यासह अन्य मसाला पिकांचीही लागवड होत असते, त्यात हळद लागवडीचे क्षेत्र अधिक आहे. यंदा हळद उत्पादकांसाठी (Turmeric Farming) हळद बऱ्यापैकी फायद्याची ठरत आहे.
सध्या हळदीला मिळत (Halad Market) असलेल्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना हे दर काही प्रमाणात का असेना, परवडत आहेत. गेल्या वर्षी हळदीचे दर हे कमी होते. त्यामुळे हळद उत्पादकांचे नुकसान झाले होते. मात्र, यंदा भावात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. ज्या प्रकारे हळद लागवड करताना, शेतकऱ्यांना जेवढा खर्च लागतो. त्यापेक्षा काही रक्कम का असेना, समाधानकारक मिळत आहे.
इतर राज्यांसह सांगलीतून आवक वाढली (Sangali Halad Market) तर हळदीच्या दरावर परिणाम होऊ शकतात. मात्र, मागणीही कायम असल्याने सध्या भावावर परिणाम आस्त दिसून येत नाही. राज्यात सर्वाधिक लागवड ही सांगली जिल्ह्यात होते. जळगाव जिल्ह्यातही सांगलीतूनच हळदीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते.
सध्याचे भाव काय..?
जिल्ह्यात हळद काढण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात रावेर, यावल या तालुक्यांसह जळगाव तालुक्यातील आसोदा, भादली या भागातही हळदीची लागवड होते. सद्यस्थितीत बाजारात ओल्या हळदीचे भाव १७०० ते १८०० रुपये एवढ़ा दर मिळत आहे. तर कोरड्या हळदीला प्रति क्विंटलप्रमाणे ६ ते ७ हजार रुपयांचा दर मिळत आहे.
हळद लागवडीसाठी ५० हजार खर्च, हातात १ लाख
हळदीला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्च लागतो. बेणे लागवड, रासायनिक व शेणखत टाकणे, फवारण्या, बॉयलिंग असा एकूण खर्च एकरी ५० हजार रुपयांपर्यंत तर उत्पादन मात्र बऱ्यापैकी वाढते. जर एकरी ५० हजार रुपये खर्च होत असेल तर शेतकऱ्यांना एकरी एकूण १ लाख रुपयांचे उत्पादन होत आहे. त्यामुळे सध्याचे दर हळद उत्पादकांना परवडणारे दिसत आहेत.
हळद लागवडीसाठी कुठली जमीन योग्य ?
हळद लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची, उच्च सेंद्रिय, सुपीक जमीन योग्य असते. हळद लागवड झाल्यानंतर या पिकाला सूर्य आणि उष्णता आवश्यक असते. परंतु ती पूर्ण सूर्यप्रकाशापासून ते अंशतः सावलीत चांगली वाढते. जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते
बेणे राखून ठेवणेच योग्य
हळदीचे बेणे साठवता येतात. हळदीच्या बियाणांची साठवणूक करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. हळदीचे बेणे साठवले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होती. बेण्यांची विक्री करता येते किंवा पुढील हंगामात हळदीच्या लागवडीस नवीन बेणे खरेदी करण्याची गरज नसते. मात्र, हे बेणे राखून ठेवताना योग्य काळजी ठेवणे गरजेचे असते.
हळद काढण्यात आली असून, यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत हळदीला चांगला दर आहे. हाच दर कायम असणेही गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी दर न मिळाल्याने हळद लागवड उत्पादकांचे नुकसान झाले होते.
- मिलिंद चौधरी, हळद उत्पादक शेतकरी, भादली