Grampnchayat Nidhi : तुमच्या गावाला किती निधी (Grampnchayat Nidhi) प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणती कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गावाच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाइटवर किंवा ई-ग्रामस्वराज पोर्टलवर तपासता येईल.
ग्रामपंचायत कोणताही खर्च सरपंच आणि ग्रामसेवक दोघांच्या संयुक्त सहमतीशिवाय करू शकत नाही. यासाठी eGramSwaraj हे एक ऑनलाइन पोर्टल आहे जिथे गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती मिळते, जसे की कोणत्या आर्थिक वर्षात किती निधी आला आणि तो कुठे खर्च झाला. निधीची माहिती कशी मिळवाल? ते पाहुयात
या सोप्या स्टेप्स वापरा
- सर्वप्रथम eGramSwaraj पोर्टलला भेट द्या
- ग्रामपंचायतीचा कोड किंवा नाव शोधा
- पोर्टलवर तुमच्या गावाचा कोड किंवा नाव टाकून ते शोधा.
- आर्थिक प्रगती (Financial Progress) या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला हव्या असलेल्या आर्थिक वर्षाची निवड करा.
- निधीचा तपशील पहा
- यामध्ये आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला, याची रक्कम 'receipt' या पर्यायासमोर दिलेली दिसेल.
इतर माहिती
गावासाठी विविध योजनांमधून निधी येतो, जो केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळतो. 15 व्या वित्त आयोगानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी प्रति वर्षी ठराविक रक्कम गावांना मिळते, ज्याचा वापर पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर कामांसाठी केला जातो. ग्रामपंचायतीला जमीन महसूल, कर (वाहने, उत्सव, टोल) आणि इतर स्थानिक स्रोतांकडूनही निधी मिळतो.
ई-ग्रामस्वराज ॲप : https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified&hl=en_IN
वेबसाईट : https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do
अधिक वाचा : E Pik Pahani : शेतात नेटवर्क नसले तरी पीक पाहणी करता येईल, हे सोपे उपाय करून पहा