Gopinath Munde Insurance Scheme : शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर विमा दाव्याचा पहिला हक्क पत्नीलाच असल्याचा निर्वाळा. युनिव्हर्सल सोम्पो विमा कंपनीला दोन लाख रुपये आणि आठ टक्के व्याजासह भरपाई देण्याचा आदेश देण्यात आले आहेत. (Gopinath Munde Insurance Scheme)
यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर विमा दाव्यांबाबत उदासीन भूमिका घेणाऱ्या विमा कंपन्यांना यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने मोठा धडा शिकवला आहे.(Gopinath Munde Insurance Scheme)
'पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क हा पत्नीलाच आहे,' असा स्पष्ट निर्वाळा देत आयोगाने युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीला दोन लाख रुपयांची भरपाई आठ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला आहे.(Gopinath Munde Insurance Scheme)
शेतात अपघात; पतीचा मृत्यू
पांढरकवडा तालुक्यातील बोथ येथील वर्षा प्रफुल्ल ठाकरे यांचे पती ७ मे २०२१ रोजी शेतात गेले असताना घसरून पडले आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हा अपघात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत येत असल्याने वर्षा ठाकरे यांनी कृषी विभागामार्फत विमा दावा दाखल केला.
विमा कंपनीचा आळशीपणा
वर्षा ठाकरे यांच्या तक्रारीनुसार कार्यालयाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला; मात्र कंपनीकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.अखेर त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे न्याय मागितला.
कंपनीने सुनावणी दरम्यान सांगितले की, 'दाव्यामध्ये इतर वारसांना सामील केलेले नाही,' त्यामुळे दावा नाकारला, असा युक्तिवाद केला.
आयोगाचा ठोस निर्णय
आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मराठे व सदस्य अमृता वैद्य यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले की, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेनुसार, पतीच्या मृत्यूनंतर पत्नी ही पहिली आणि मुख्य हकदार ठरते. इतर वारसांना सामील न केल्याचे कारण ग्राह्य धरता येणार नाही.'
त्यामुळे आयोगाने विमा कंपनीला २ लाख रुपयांची भरपाई, ८ टक्के व्याज, तसेच १० हजार रुपये मानसिक त्रासाबद्दल आणि ५ हजार रुपये तक्रार खर्चासाठी देण्याचा आदेश दिला.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकरी विधवांना नवा न्याय मिळाला असून विमा दावे नाकारताना कंपन्यांना आता कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी न्यायाचा आणि आत्मविश्वासाचा नवा आदर्श ठरत आहे.
