Gopinath Munde Accident Relief Scheme : छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातीलसोयगावतालुक्यात गेल्या दोन वर्षांत शेतीशी संबंधित विविध नैसर्गिक अपघातांत तब्बल ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर एका शेतकऱ्याला गंभीर अपघातामुळे अपंगत्व आले आहे. (Gopinath Munde Accident Relief Scheme)
शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या १८ शेतकऱ्यांच्या वारसांना एकूण ३१ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांनी दिली.(Gopinath Munde Accident Relief Scheme)
विविध अपघातांत शेतकऱ्यांचा मृत्यू
शेतात काम करताना वीज पडणे, उंचावरून पडणे, विषबाधा, पाण्यात बुडणे, सर्पदंश यांसारख्या नैसर्गिक व आकस्मिक कारणांमुळे १९ एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ या कालावधीत ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते.
१८ कुटुंबीयांना मदतीचा हात
या अर्जांपैकी १८ शेतकऱ्यांचे वारस पात्र ठरले असून त्यांना मिळून ३१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर दोन अर्ज अपात्र ठरले आहेत.
अजूनही प्रस्ताव प्रलंबित
चार शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. तसेच एका शेतकऱ्याला अपघातात अपंगत्व आल्यामुळे त्यालाही मदतीसाठी शासनाने मान्यता दिली आहे. उर्वरित अर्जांत त्रुटी आढळल्यामुळे ते दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत.
शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी अपघातानंतर तात्काळ कृषी विभागाकडे अर्ज सादर करावा. आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून दिल्यास पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेंतर्गत तत्काळ मदत दिली जाईल.– भारत कासार, तालुका कृषी अधिकारी, सोयगाव
हेहीवाचासविस्तर: Crop Insurance : शेतकऱ्यांचे नुकसान, कंपन्यांचा फायदा; खरीपहंगामात २९० कोटींची कमाई