गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राकडून जिल्ह्यातील स्थानिक गरजा व उपलब्ध संसाधनांचा विचार करून ओळख करण्यात आलेल्या सात कमी खर्चिक तंत्रज्ञानांचे प्रस्ताव राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान यांच्याकडे भारत सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावांना करारनामाअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आले आहे.
भाग म्हणून मल्टिफूड प्रोसेसिंग युनिट तसेच मल्टी ट्री क्लाइंबर या तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. यासोबतच निवडक समुदाय सदस्यांना प्रत्यक्ष (हँड्स-ऑन) प्रशिक्षण देण्यात आले. या अंमलबजावणीचा भाग म्हणून मल्टिफूड प्रोसेसिंग युनिट तसेच मल्टी ट्री क्लाइंबर या तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
कोंदावाही येथे 'मल्टी ट्री क्लाइंबर'चे प्रात्यक्षिक
मल्टी ट्री क्लाइंबरच्या प्रात्यक्षिकासाठी धानोरा तालुक्याच्या कोंदावाही गावाची निवड करण्यात आली होती. यावेळी कोयंबतूर येथील नवोन्मेषक श्रीवर्धन यांनी उपस्थित राहून सदर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले. या प्रात्यक्षिकास ताडी / ताड काढणारे स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
विविध यंत्रांचे प्रात्यक्षिक
मल्टिफूड प्रोसेसिंग युनिटअंतर्गत विविध फळांपासून ज्यूस, जॅम, जेली, केचप, साबण व जेल आदी उत्पादनांच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राच्या परिसरात घेण्यात आले. सदस्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात याव्यतिरिक्त कापूस वात बनविण्याचे यंत्र, मल्टी कमोडिटी ग्राइंडर, पानांपासून ताटे व वाट्या बनविण्याचे यंत्र, मका सोलणारे यंत्र तसेच बांबू पट्टी व रॉड बनविण्याचे यंत्रही इतर तंत्रज्ञान येत्या महिन्यात प्रात्यक्षिक व प्रशिक्षणासाठी सादर करण्यात येणार आहेत.
