गडचिरोली : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम २०२५-२६ साठी गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, केंद्रांवर शेतकऱ्यांची सर्रास आर्थिक लूट केली जात आहे. नियमात नसतानाही ४० किलोच्या एका पोत्यासाठी हमाली १५ रुपये घेतली जात असून एका क्विंटलमागे शेतकऱ्यांकडून ३७ रुपये वसुली केली जात आहे.
शेतकरी नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे आदेश असले तरी धान खरेदी संस्थांनी पावती बुक छापून १०० ते २०० रुपये नोंदणीसाठी वसुली केली जात आहे. तसेच खरेदी केंद्रावर धान विक्री करताना एका कट्ट्याचे वजन ४०.६०० किलोपेक्षा अधिक घेतले जाऊ नये, असा नियम असतानाही एका पोत्यात ४१ किलो धान खरेदी केले जात आहेत. काही ठिकाणी तर ४१.२०० किलो ग्रॅम धान एका पोत्यात घेतले जात आहे.
आधारभूत व्यापाऱ्यांकडून किमतीखाली धान खरेदी
जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून २ हजार ३६९ किंवा २ हजार ३८९ रुपये प्रतिक्विंटल भाव थानाला दिला जात नसून धानाची २१०० ते २२०० रुपयर्यात खरेदी केली जात आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून चालविलेला हा प्रकार गंभीर आहे.
हार्वेस्टरद्वारे मळणीचे धान - खरेदी करण्यास नकार
गडचिरोली तालुक्याच्या अमिर्झा थान खरेदी केंद्रावर हार्वेस्टरद्वारे मळणी = केलेले धान खरेदी करण्यास येथील केंद्रचालकांनी नकार दिला. त्यामुळे या - केंद्राअंतर्गत येणाऱ्या तीन ते चार - शेतकऱ्यांना धान परत न्यावे लागले. - एका शेतकऱ्याने तर थ्रेशर मशीन - बोलावून धान पुन्हा उडवून विक्री केले.
मार्केटिंग अधिकारी म्हणतात, हमाली देऊ नका
धान विक्रीच्या वेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची हमाली रक्कम, रोख पैसे किंवा इतर कोणतेही शुल्क खरेदी केंद्रास देऊ नये. अशा स्वरूपाची कोणतीही मागणी झाल्यास ती अनियमितता समजून तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांनी केले आहे.
शासनाकडून प्रतिक्विंटल १०.७५ रुपये हमाली
धान खरेदी करणाऱ्या संस्थांना शासनाकडून प्रतिक्विंटल १० रुपये ७५ पैस हमालीसाठी दिले जातात. परंतु संस्था ह्या त्या पैशांची परस्पर विल्हेवाट लावत असून धानाची मोजणी करणाऱ्या हमालांचा मेहनताना शेतकऱ्यांकडून वसूल केला जात आहे.
