अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा १ लाख रुपयावरून २ लाख रुपये इतकी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्याने देशाबाहेर दौऱ्याकरिता केलेल्या प्रवास खर्चाच्या ५० टक्के अथवा २ लाख रुपये यातील जे कमी असेल त्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" ही योजना दि.६.६.२००७ च्या शासन निर्णयामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार राबविण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्याने देशाबाहेर दौऱ्याकरिता केलेल्या प्रवास खर्चाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त १ लाख प्रती शेतकरी या मर्यादेत अनुदान वाढ करण्यात आली आहे. सन २०१२ ते २०२५ या १३ वर्षाच्या कालावधीतीतील विमानाची तिकिटे, संबंधित देशातील राहण्याची व्यवस्था व इतर अनुषंगिक खर्च इ. बाबींच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झालेली आहे. तसेच डॉलर व युरो या चलनाच्या रूपयांतील विनिमय दरामध्ये (Exchange Rate) देखील वाढ झालेली आहे.
सदर दरवाढ लक्षात घेता, प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा १ लाख मध्ये वाढ करून प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा २ लाख रुपये करण्याची विनंती आयुक्त (कृषि) यांनी पत्रान्वये केली होती. या अनुषंगाने "राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल अनुदान मर्यादा रु.१ २ लाख रुपये वरून २ लाख रुपये इतकी वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.