Biyane Vatap : खरीप हंगामाच्या (Kharif Season) तोंडावर कृषी विभागाकडून (Agriculture Department) शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे वाटप सुरु आहे. या वाटपाची मुदत कालपर्यंत म्हणजेच ३१ मे पर्यंतच होती. मात्र या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून आता २ जूनपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.
कृषी विभागाकडून राबविण्यात येणारी 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप (Biyane Vatap) ही एक योजना आहे. खरीप हंगाम 2025 करिता “महाडीबीटी - शेतकरी योजना” पोर्टल वर प्रमाणित बियाणे 100 टक्के अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
खरीप हंगाम 2025 करिता "महाडीबीटी शेतकरी योजना" पोर्टल वर प्रमाणित बियाणे 100% अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
समाविष्ट बियाणे : सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इ.,
पोर्टल वर अर्ज सादर करण्यास मुदत वाढ : 02 जून 2025
बियाणे सोडत : 3 - 5 जून दरम्यान
पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडत साठी ग्राह्य धरले जातील. सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती निवडीचा संदेश दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ
https://mahadbt.maharashtra.gov.in/