Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय?

शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय?

Latest News Farmers are forced to throw brinjals on the road Price is Rs 4 per kg | शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय?

शेतकऱ्यांवर वांगे रस्त्यावर फेकण्याची वेळ, खर्चही निघेना; प्रति कॅरेट काय भाव मिळतोय?

brinjal Market : उन्हाची दाहकता वाढल्याने वांग्याचे बाजारभाव कोसळून खाली आले आहे.

brinjal Market : उन्हाची दाहकता वाढल्याने वांग्याचे बाजारभाव कोसळून खाली आले आहे.

नाशिक : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पारा चाळिशीवर पोहोचला आहे. उन्हाची दाहकता वाढल्याने वांग्याचे बाजारभाव कोसळून खाली आले आहे. यामुळे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर रस्त्याच्या कडेला वांगी फेकण्याची वेळ आली आहे.

शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच अडचणीत सापडला असताना, बारटोक भरता या व्हरायटीचे लांब असणाऱ्या वांग्याला बाजार समितीत प्रति कॅरेट ५० ते ७० रुपये भाव मिळत आहे. प्रती किलो चार रुपये भाव मिळत असल्याने खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत  सापडला आहे. 

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे नियोजन करून शेतातील पिके जगवण्यासाठी शेतकरी आधीच धडपड करत आहे. त्यात विहिरी तळ गाठू लागल्या आहेत. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहता कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक भार शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असून पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. वाढत्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

असा आहे एकूण खर्च

  • एकरी खर्च एक ते एक लाख वीस हजार
  • मशागत - १५ ते २० हजार
  • बेड तयार करणे - ४ ते ६ हजार
  • मल्चिंग पेपर- ५ ते ६ हजार
  • एकूण खते- ४० ते ५० हजार
  • मजुरी- एकूण ३० ते ४० हजार

 

शेतकरी चिंतित
मागील वर्षी में २०२५ पासून पावसाळा संपेपर्यंत जवळपास ८ ते ९ महिने मोसमी व बेमोसमी पाऊस पडला. तेव्हापासून शेतातील अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी पावसाने खराब झालेल्या पिकांना बाजारभाव मिळाला नाही. बाजारभावाची स्थिती कमीच आहे. तब्बल एक वर्षे उलटले, तरी पिकांना बाजारभाव मिळत नाही. परिणामी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून वांगे उत्पादकांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

सध्या कोणत्याच भाजीपाला पिकाला बाजारभाव मिळत नाही. वांगी हे खर्चिक पण उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे, म्हणून लाखो रुपये खर्च करून बारटोक भरता या व्हरायटीच्या वांग्याची लागण केली होती. मात्र, तीन आणि चार रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. 
- संतोष डोकफोडे, वांगी उत्पादक, म्हाळसाकोरे.

Web Title : कीमतें गिरने से परेशान किसानों ने फेंके बैंगन, लागत भी नहीं निकली।

Web Summary : नाशिक के किसान कीमतें गिरने से परेशान होकर बैंगन फेंक रहे हैं, क्योंकि उन्हें ₹4/kg मिल रहा है जबकि लागत ₹1.2 लाख/एकड़ है। पिछले साल की फसल क्षति के बाद तीव्र गर्मी और पानी की कमी ने नुकसान को और बढ़ा दिया है, जिससे किसानों में व्यापक संकट है।

Web Title : Distressed farmers dump eggplants as prices crash; costs unmet.

Web Summary : Nashik farmers are dumping eggplants due to rock-bottom prices, fetching ₹4/kg against ₹1.2 lakh/acre costs. Intense heat and water scarcity exacerbate losses after last year's crop damage, triggering widespread farmer distress.