Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी अपघात योजनेचे अनुदान आले, 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता, शासन निर्णय निर्गमित 

शेतकरी अपघात योजनेचे अनुदान आले, 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता, शासन निर्णय निर्गमित 

Latest news Farmers' Accident Scheme Grant Received, Approval for Distribution of Funds of Rs 20 Crores, Government Decision Issued | शेतकरी अपघात योजनेचे अनुदान आले, 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता, शासन निर्णय निर्गमित 

शेतकरी अपघात योजनेचे अनुदान आले, 20 कोटींचा निधी वितरणास मान्यता, शासन निर्णय निर्गमित 

Shetkari Apghat Yojana : योजनेअंतर्गत २० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Shetkari Apghat Yojana : योजनेअंतर्गत २० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Shetkari Apghat Yojana :    सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना अपघात योजनेचे सानुग्रह अनुदान खात्यावर पाठवले जाणार आहे. 

शासन निर्णयाव्दारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सन २०२३-२४ पासून "गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना" राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान" या योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता एकूण १४०.०० कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत अनुक्रमे ६०.३५ कोटी, २७.८४ कोटी व ३१.८१ कोटी असे एकूण १२० कोटी इतका निधी यापूर्वी वितरीत करण्यात आला आहे. आता कृषि आयुक्तालयाच्या पत्राव्दारे प्राप्त झालेल्या प्रस्तावास अनुसरुन सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात माहे ऑक्टोबर, २०२५ ते माहे डिसेंबर, २०२५ या कालावधीत सदर योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेले एकूण १०१९ (९८० मृत्यू + ३९ अपंगत्व) इतके दावे निकाली काढण्यासाठी २०.००. कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत" सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर पासून ते डिसेंबर एन्डपर्यंत या कालावधीतील तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले एकूण १०१९ (९८० मृत्यू ३९ अपंगत्व) इतके दावे निकालात काढण्यासाठी २० कोटी इतका निधी, आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच हे अनुदान मिळणार आहे. 


 

Pik Vima Manjur : तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही, दोन मिनिटांत मोबाईलवर कसा पाहायचा?

 

Web Title : किसान दुर्घटना योजना अनुदान जारी: ₹20 करोड़ का फंड स्वीकृत

Web Summary : गोपीनाथ मुंडे किसान दुर्घटना योजना के तहत अक्टूबर से दिसंबर 2025 तक के 1019 दावों (980 मौतें, 39 विकलांगता) के लिए ₹20 करोड़ जारी किए गए। पात्र किसानों को जल्द ही अनुदान मिलेगा। सरकार द्वारा इस निधि वितरण को मंजूरी दी गई है।

Web Title : Farmer Accident Scheme Grant Released: ₹20 Crore Fund Approved

Web Summary : ₹20 crore released under Gopinath Munde Farmer Accident Scheme for 1019 claims (980 deaths, 39 disabilities) from October to December 2025. Eligible farmers will soon receive the grant. This fund distribution has been approved by the government.