Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

latest news Farmer Success Story: 'Golden' farming formula; Young man earns big money at low cost Read in detail | Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

Farmer Success Story :'सोनेरी' शेतीचा फॉर्म्युला; कमी खर्चात तरुणाची मोठी कमाई वाचा सविस्तर

Farmer Success Story : कमी जमीन आणि कमी गुंतवणूक असतानाही शेतीतून मोठा नफा मिळवता येतो, हे कंधार तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या २० गुंठ्यांत हळद, कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत त्यांनी केवळ १४ हजार खर्चातून तब्बल १.५७ लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यांच्या या 'स्मार्ट शेती' प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Farmer Success Story)

Farmer Success Story : कमी जमीन आणि कमी गुंतवणूक असतानाही शेतीतून मोठा नफा मिळवता येतो, हे कंधार तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या २० गुंठ्यांत हळद, कापूस आणि तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत त्यांनी केवळ १४ हजार खर्चातून तब्बल १.५७ लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यांच्या या 'स्मार्ट शेती' प्रयोगाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. (Farmer Success Story)

गोविंद शिंदे

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी मारुती कदम यांनी कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरपीक पद्धतीच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवत शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. (Farmer Success Story)

अवघ्या वीस गुंठे क्षेत्रात त्यांनी हळद, कापूस आणि तूर यांचे आंतरपीक घेत फक्त १४ हजार खर्चातून तब्बल १.५७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.(Farmer Success Story)

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड

मारुती कदम यांनी पारंपरिक पद्धतीत बदल करत आधुनिक शेतीकडे वाटचाल केली. त्यांनी 'लाल शेलम' जातीची हळद लागवड करताना पाण्याचे अचूक नियोजन, सेंद्रिय शेणखताचा वापर आणि आवश्यक तेथे रासायनिक फवारणी यांचा योग्य समतोल साधला. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.

आंतरपीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग

एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी हळदीसोबत कापूस आणि तूर ही आंतरपिके घेतली. यामुळे जमिनीचा पूर्ण क्षमतेने वापर झाला आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार झाला. हीच त्यांच्या यशाची मोठी किल्ली ठरली.

उत्पादन आणि उत्पन्नाचा हिशोब

हळद : ७ क्विंटल उत्पादन – १,०५,००० रु. उत्पन्न

कापूस : ४ क्विंटल उत्पादन – ४०,००० रु. उत्पन्न

तूर : १.५ क्विंटल उत्पादन – १२,००० रु. उत्पन्न

एकूण उत्पन्न : १,५७,००० रु.

एकूण खर्च : १४,००० रु.

अशा प्रकारे कमी खर्चात जास्त नफा मिळवण्याचे समीकरण त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध केले.

कुटुंबाच्या मेहनतीचा वाटा

या प्रयोगात त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मजुरी खर्च कमी ठेवण्यात याचा मोठा फायदा झाला. नियोजनबद्ध कामामुळे उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.

यूट्यूबमधून शिकले नवे तंत्रज्ञान

मारुती कदम यांनी यूट्यूबवरील कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले. सतत नवीन माहिती घेणे आणि त्यानुसार शेतीत बदल करणे, ही त्यांची सवयच त्यांच्या यशामागील प्रमुख कारण ठरली.

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

मारुती कदम यांची ही यशोगाथा परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कमी क्षेत्र, कमी गुंतवणूक आणि योग्य नियोजन यांच्या साहाय्यानेही मोठे उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

कमी गुंतवणूक – जास्त नफा हे सूत्र प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या तरुण शेतकऱ्याचा प्रयोग आता अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Garlic Farming : लसूण लागवडीत क्रांती! 'या' नव्या पद्धतीने शेतकऱ्याचा जबरदस्त फायदा

अधिक वाचा : AI Farming : परंपरेला टेक्नॉलॉजीची जोड; 'एआय' गुढीने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Web Title : किसान की 'सुनहरी' खेती का फॉर्मूला: कम लागत में बड़ी कमाई

Web Summary : नांदेड़ के युवा किसान मारुति कदम ने अंतरफसल से बड़ी सफलता हासिल की। हल्दी, कपास और तुअर की अंतरफसल से केवल 20 गुंठा जमीन से ₹1.57 लाख कमाए, जबकि खर्च केवल ₹14,000 था। उन्होंने आधुनिक तकनीकों और यूट्यूब मार्गदर्शन को अपनाया।

Web Title : Farmer's 'Golden' Farming Formula: Big Earnings with Low Costs

Web Summary : Maruti Kadam, a young farmer from Nanded, achieved remarkable success through innovative intercropping. He earned ₹1.57 lakhs from just twenty Guntha land by intercropping turmeric, cotton, and tur, spending only ₹14,000. He adopted modern techniques and YouTube guidance for his success.