Farmer ID : राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) बंधनकारक करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हे फार्मर आयडी तयार केले असून त्याशिवाय योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट आदेश आहेत.
त्यामुळे अनेक शेतकरीफार्मर आयडी (farmer Id card) काढण्यात व्यस्त आहेत. मात्र सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांना महाडीबीटी व इतर योजनांचा लाभ घेत असताना फार्मर आयडी देऊनही अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
फार्मर आयडीची नोंदणी (Farmer Id Registration) होणे आणि फार्मर आयडी पूर्णपणे तयार होणे. यामध्ये फरक असून यामध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांना सेंट्रल आयडी नावाचा फार्मर आयडी देण्यात येतो. मात्र यानंतरही अर्ज अप्रूव्हची प्रक्रिया शिल्लक राहते.
त्यामुळे नोंदणी करूनही अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी वापरता येत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जर समजा तुम्हाला असा अडथळा येत असेल तर तुम्ही एकदा ॲग्री स्टॅक या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहू शकता.
- यासाठी agristack या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.
- सर्वप्रथम ॲग्री स्टॅक या संकेतस्थळावर गेल्यानंतर फार्मर या पर्याय समोर क्लिक करून लॉगिन करा.
- त्यासाठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड किंवा ओटीपी द्वारे देखील आपण लॉगिन करू शकता.
- पुढे जाऊन शेतकऱ्या संदर्भात माहिती दिसून येईल. यात जर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय नसेल तर तुमचा नंबर व्हेरिफाय करून घ्यावा.
- यामुळे ओटीपी येण्यास अडचणी येतात.
- यानंतर व्ह्यू माय इन्फॉर्मेशन या पर्यायावर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती पाहता येईल.
- यामध्ये जिल्हा तालुका गाव मोबाईल नंबर जमिनीची माहिती यासह इतर माहिती दिसेल ही माहिती तपासून घ्यावी.
- अन्यथा या माहितीत काही त्रुटी असल्यास पुनश्च एकदा ही माहिती अपडेट करून घ्यावी.