यवतमाळ : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीचा धोका लक्षात घेता कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत.(fake seeds alert)
शेतकऱ्यांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला असून, संशयास्पद विक्री किंवा बनावट बियाण्यांची माहिती तात्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(fake seeds alert)
यवतमाळ जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांची घुसखोरी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.(fake seeds alert)
तक्रार नोंदवण्यासाठी विशेष व्यवस्था
बोगस बीटी बियाण्यांची विक्री, साठवणूक किंवा वितरण आढळल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक :९४०३२२२२२१
तालुका स्तरावरील बियाणे निरीक्षकांकडेही तक्रार करता येणार
माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाणार
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
* बियाणे नेहमी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा
* खरेदी करताना पक्के बिल घ्या
* बिलावर पुढील तपशील तपासा:
पिकाचे नाव, वाण (Variety), लॉट क्रमांक, वैधता मुदत, दर आणि एकूण किंमत
* रस्त्यावर किंवा अनधिकृत विक्रेत्याकडून खरेदी टाळा
* जास्त उत्पादनाचे आमिष दाखवणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नका
'एचटीबीटी' बियाण्यांवर बंदी
कृषी विभागाने विशेष इशारा देत सांगितले आहे की, एचटीबीटी कपाशी बियाणे (HTBT) भारतात कायदेशीरदृष्ट्या प्रतिबंधित आहेत.
ही बियाणे सामान्यतः 'राउंडअप बीटी' किंवा 'चोर बीटी' या नावाने ओळखली जातात. अशा बियाण्यांची विक्री, साठवणूक किंवा लागवड केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते.
बोगस बियाण्यांचे दुष्परिणाम
तज्ज्ञांच्या मते, बोगस किंवा अप्रमाणित बियाण्यांमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
उगवण क्षमता कमी
नवीन रोगराईचा प्रादुर्भाव
उत्पादनात घट
जमिनीची सुपीकता कमी होणे
खरीप हंगामाच्या सुरुवातीपूर्वीच प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
टोल फ्री क्रमांक, कडक नियम आणि जागरूकता यामुळे बोगस बियाण्यांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांनीही सावधगिरी बाळगून अधिकृत मार्गानेच बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा सविस्तर :Fake Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक? खत विक्रीत बनवेगिरीचा पर्दाफाश
अधिक वाचा : Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
Web Summary : Yavatmal agriculture department warns farmers about fake seeds before Kharif season. Toll-free number announced for reporting. Purchase seeds from licensed dealers, check bills carefully, and avoid HTBT seeds. Beware of unrealistic promises.
Web Summary : यवतमाल कृषि विभाग ने खरीफ सीजन से पहले नकली बीजों के बारे में किसानों को चेतावनी दी। रिपोर्ट करने के लिए टोल-फ्री नंबर घोषित। लाइसेंस प्राप्त डीलरों से बीज खरीदें, बिलों की सावधानीपूर्वक जांच करें और एचटीबीटी बीजों से बचें। अवास्तविक वादों से सावधान रहें।