E Pik Pahani : रब्बी २०२४-२५ व उन्हाळी २०२४-२०२५ हंगामापासून राज्यभर डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रकल्पांतर्गत ई-पिक पाहणी प्रक्रिया सुधारित मोबाईल ॲपच्या माध्यमातून अंमलात आणली जात आहे.
हंगामाचा सुरुवातीचा ४५ दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांना मोबाईल ॲप द्वारे ई-पीक पाहणी साठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तद्नंतर उर्वरित खातेदारांची ई-पीक पाहणी नोंद करणे करिता सहायक स्तरावर 45 दिवसांचा कालावधी मोबाईलॲप द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य हे पारंपारिक खरीप राज्य असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पिक पेरणी केली जाते. त्यामुळे खरीप हंगामात पिक पाहणी नोंदवताना मोबाईल अॅपवर भार येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने भार क्षमतेचे चाचणी, इ-पिक पाहणी प्रणालीची कर्यक्षमतेच्या व अनुषांगिक इतर तांत्रिक चाचण्या करण्याकरीता १० दिवसांचा डाऊनटाईम घेणे आवश्यक आहे.
राज्यात दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून खरीप हंगाम २०२५ सुरु होत आहे. मात्र तत्पूर्वी काही तांत्रिक चाचण्या करण्याकरीता दिनांक २१ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ दहा दिवस मोबाईल ॲप बंद ठेवण्यात येत आहे. याबाबत आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात याव्यात. तसेच याबाबत शेतकऱ्यांना अवगत करण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे.
PM Kisan : पीएम किसान 20 व्या हफ्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्वाचं आवाहन