नाशिक : रब्बी हंगामातील ई – पीक पाहणी राज्यस्तरावर १५ डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली होती. शेतकरी स्तरावर ई - पीक पाहणी करण्याची मुदत सुरुवातीला १५ जानेवारीपर्यंत असून रब्बी हंगामातील ई - पीक पाहणी करण्यासाठी उरले अवघे ९ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर ज्या शेतकऱ्याची पीक पाहणी करण्याची राहिलेली असल्यास त्यांना सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करावी लागणार आहेत.
चांदवड तालुका प्रथम स्थानी असून तालुक्यात आतापर्यंत १०२८०३ पैकी शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ४१६० इतक्या शेतकऱ्यानी क्षेत्र हे. ३२३५.१६ आर वर आणि बागलाण तालुक्यात आतापर्यंत १ लाख ११ हजार १९८ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २७३९ इतक्या शेतकऱ्यानी क्षेत्र हे. ३२३५.१६ आर इतकी पीक पाहणी नोंदविलेली आहेत. रब्बी हंगामात सर्वच सर्व शेतकरीशेती करू शकत नसले तरी ज्या ठिकाणी बागायत क्षेत्रावर व ज्या ठिकाणी पिकंसाठी पाण्याची सुविधा असलेया मोजक्याच क्षेत्रावर पीक घेतले जाते.
बागलाण तालुक्याची ई - पीक पाहणी वाढविण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी लखमापूर दीपक मोठे विशेष प्रयत्न करीत असून पीक पाहणीची आकडेवारी वाढविण्यासाठी यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ (राहुरी अंतर्गत) डांळीब संशोधन आणि तंत्रज्ञान प्रसार केंद्र येथे भेट घेत संबधित शेताच्या बाधावर जात ई–पीक पाहणी करीत त्याचे महत्व समजून संगितले. तालुक्यातील लखमापूर येथील त्याचंबरोबर शेतकऱ्यांना पीक पाहणी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
बागलाण तालुक्यातील रब्बी हंगामात जरी सर्वच क्षेत्रावर शेती केली जात नसली तरी ज्या शेतकऱ्यांनी पिके लावलेली आहेत. त्यांनी पीक पाहणी नोंदवून घ्यावी.
- महेश शेलार, उपविभागीय अधिकारी, बागलाण
रब्बी हंगामातील ई- पीक पाहणी करण्याची मूदत १५ जानेवारी पर्यत असून बागलाण मधील पीक लागवड केलेल्या शेतकरी बांधावानी विहित मुदतीत स्वताच्या मोबाईल वरून पिकांची नोद करून घ्यावी.
- कैलास चावडे, तहसीलदार बागलाण
