E Pik Pahani : राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी/पुर इत्यादी कारणास्तव क्षेत्रीय कार्यालयांकडून केलेल्या मागणी नुसार दिनांक 20 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करिता मुदत वाढ देण्यात आली होती.
परंतु, क्षेत्रीय कार्यालयांकडून सदर मुदत पुन्हा वाढविण्या करिता विनंती करण्यात आल्यामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करिता 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणी केलेली नाही, अशा सर्व शेतकरी बांधवांनी मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि तातडीने आपली पीक पाहणी पूर्ण करावी. रात्री पीक पाहणी करु नका, कारण अंधारामुळे पिकाचा फोटो स्पष्ट दिसत नाही. फोटोवरून फोटो काढू नका, थेट शेतातील पिकाचा फोटो घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
अचूकता मर्यादा वाढली
गेल्या वर्षी उन्हाळी हंगामात या ॲपद्वारेच पिकांची नोंदणी केली होती. तेव्हा पिकाचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवड केलेल्या क्षेत्राच्या ५० मीटरच्या आतील फोटो ॲपकडून स्वीकारला जात होता. आता यात बदल केला.
ही मर्यादा आता २० मीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे पीक नोंदणी करताना अधिक अचूकता येणार असल्याची माहिती ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.