Lokmat Agro >शेतशिवार > नाशिक जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण; 30 सप्टेंबरपर्यंत मुदत 

नाशिक जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण; 30 सप्टेंबरपर्यंत मुदत 

Latest news E-Peak survey completed on 4 lakh hectares of area in Nashik district; Deadline till 30th September | नाशिक जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण; 30 सप्टेंबरपर्यंत मुदत 

नाशिक जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण; 30 सप्टेंबरपर्यंत मुदत 

E Pik Pahani : मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

E Pik Pahani : मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकरी स्तरावर 3 लाख 98 हजार 775 हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी पूर्ण झाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी  (प्रशासन) तुकाराम हुलवळे यांनी दिली आहे. तर खरीप हंगाम 2025 करीता शेतकरी स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंदणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी ई-पीक नोंदणी पूर्ण न करू शकल्यामुळे आणि ई-पीक नोंदणी करण्यापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, कळवण, इगतपुरी, येवला, बागलाण, चांदवड, मालेगाव, देवळा, नांदगाव, पेठ व सुरगाणा या 15 तालुक्यात एकूण ई- पीक पाहणी करावयाच्या मालकी क्षेत्राची संख्या 13 लाख 23 हजार 484  इतकी आहे. 

त्यापैकी 19 सप्टेंबरपर्यंत पीक पाहणी नोंदविलेल्या मालकी क्षेत्राची संख्या 4 लाख 57 हजार 424  इतकी आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यात ई-पीक पाहणी करावयाचे एकूण क्षेत्र 11 लाख 3 हजार 82 हेक्टर इतके असून यापैकी  शेतकरी स्तरावर 3 लाख 98 हजार 775  हेक्टर इतक्या क्षेत्रावर आतापर्यंत ई-पीक पाहणी झाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपच्या माध्यामतून ई-पीक पाहणी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करावी व आपल्या हक्काचा लाभ निश्चित करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Latest news E-Peak survey completed on 4 lakh hectares of area in Nashik district; Deadline till 30th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.