Join us

Sharad Pawar : राज्यात पाणी नाही, चारा नाही, शरद पवार यांनी सरकारकडे 'काय' मागणी केली?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 5:18 PM

आज शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

राज्यांतील 40 तालुक्यात दुष्काळाची स्थिती गंभीर असून 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छाये खाली आहे. राज्यातील 2 हजार 292 महसूल मंडळापैकी 1500 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. धरणातील पाणीसाठा तळास गेला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान देखील केलं आहे, अशा स्थितीत शासनाने यावर तातडीने उपपयोजना करण्याची गरज असल्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

आज शरद पवार यांनी दुष्काळाच्या सद्यस्थितीवर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत उन्हाच्या झळांसह अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळी परिस्थितीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यभरात पाण्याची टंचाई सध्या जाणवत आहे. राज्यातील मोठ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील धरणात 10 टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिकमध्ये जिल्ह्यातील धरणांत देखील कमी पाणी शिल्लक राहिले आहे. 

ते पुढे म्हणाले की, पुण्यात 50 मध्यम प्रकल्प असून तिथं 24 टक्के पाणीसाठा आहे. तसेच उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. माजलगाव मध्ये 0 टक्के पाणीसाठा आहे. मांजरा येथे 0.37 टक्के पाणीसाठा आहे. तर नगर जिल्ह्यात 9 टक्के पाणीसाठा आहे. आपण सध्या जून महिन्याच्या अखेरीला आहोत. जुलै एंडपर्यंत हिच स्थिती राहिलं, अशी परिस्थिती आहे. काहीं मराठवाड्यातील जिल्हे असे आहेत, जिथं परिस्थिती गंभीर होईल. धाराशिव, परभणी येथे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत राज्यात 755 पाणी टँकर सुरू आहेत. तसेच पुण्यातील बारामती, जत, कोरेगाव या परिसरात टँकरची गरज वाढली आहे.  जवळपास 10 हजार 572 अशी गावे आहेत, जिथं टँकर गरज असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. 

सरकारकडे काय मागणी केली? दरम्यान शरद पवार दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना सरकारकडे मागणी केली की, पीक कर्जाचे पुनर्गठन करा, विमा कंपनी नुकसान भरपाई द्यायला टाळाटाळ करत असल्याने यांना सरकारने आदेश देण्याची गरज आहे. शिवाय वीज बिल भरल नाही, म्हणुन वीज पुरवठा खंडित करू नये. तसेच अवकाळी पाऊस बरसत आहे, अशा भागात ज्या ठिकाणीं पीक गेलं आहे तिथं शाळा परिक्षा शुल्कातून माफी द्यावी, अशी मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.  

टॅग्स :शरद पवारदुष्काळनाशिकपाणी टंचाईमुंबईमहाराष्ट्र