Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Drone Pilot Training : शेतीत ड्रोनचा जमाना! युवकांना मिळणार फ्री ट्रेनिंग आणि लायसन्स

Drone Pilot Training : शेतीत ड्रोनचा जमाना! युवकांना मिळणार फ्री ट्रेनिंग आणि लायसन्स

latest news Drone Pilot Training: The era of drones in agriculture! Youth will get free training and license | Drone Pilot Training : शेतीत ड्रोनचा जमाना! युवकांना मिळणार फ्री ट्रेनिंग आणि लायसन्स

Drone Pilot Training : शेतीत ड्रोनचा जमाना! युवकांना मिळणार फ्री ट्रेनिंग आणि लायसन्स

Drone Pilot Training : आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना, शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.(Drone Pilot Training)

Drone Pilot Training : आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असताना, शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.(Drone Pilot Training)

Drone Pilot Training : आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, फवारणी, पिकांचे सर्वेक्षण, खत व्यवस्थापन आणि शेती निरीक्षणासाठी ड्रोन मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत.(Drone Pilot Training)

अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकृत ड्रोन पायलट परवानाही दिला जाणार आहे.(Drone Pilot Training)

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत 'अमृत ड्रोन मिशन' अंतर्गत हे प्रशिक्षण दिले जात आहे.(Drone Pilot Training)

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य मिळावे आणि त्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.(Drone Pilot Training)

शेतीमध्ये ड्रोनचा वाढता वापर

सध्या शेतीमध्ये कीटकनाशक फवारणी, पिकांचे निरीक्षण, जमिनीचे मोजमाप, पाणी व्यवस्थापन तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रभावी ठरत आहे. त्यामुळे प्रशिक्षित ड्रोन पायलट्सची मागणी वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील युवकांसाठी हे प्रशिक्षण भविष्यात रोजगाराचे नवे दालन उघडणारे ठरणार आहे.

विशेषतः शेतकरी कुटुंबातील युवकांना या प्रशिक्षणात प्राधान्य देण्यात येणार असल्याने कृषी क्षेत्राशी संबंधित तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

प्रशिक्षण पूर्णपणे मोफत

या प्रशिक्षणाचा कालावधी १० दिवसांचा असून, प्रशिक्षणादरम्यान राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण मोफत व्यवस्था अमृत संस्थेमार्फत केली जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवाना देण्यात येणार आहे.

कोण अर्ज करू शकतात?

या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिला जाणार आहे.

अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे आणि तो किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.

याशिवाय अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे.

अर्ज कुठे कराल?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर ४, सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधुनिक शेतीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील युवकांसाठी हे प्रशिक्षण रोजगार, तंत्रज्ञान आणि शेती विकासाचा नवा मार्ग ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर :Monsoon Arrival Date : मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान

अधिक वाचा : Dairy Farming Subsidy : महिला बचत गटांसाठी सुवर्णसंधी; 'या' योजनेत मिळणार ७५% अनुदान

Web Title : कृषि क्षेत्र में युवाओं के लिए मुफ्त ड्रोन पायलट प्रशिक्षण

Web Summary : महाराष्ट्र किसान परिवारों के युवाओं को मुफ्त ड्रोन पायलट प्रशिक्षण प्रदान करता है। कार्यक्रम आधुनिक कृषि तकनीकों को कवर करता है और पूरा होने पर एक आधिकारिक ड्रोन पायलट लाइसेंस प्रदान करता है, जिससे कृषि में रोजगार के अवसर बढ़ेंगे।

Web Title : Free Drone Pilot Training for Youth in Agriculture Sector

Web Summary : Maharashtra offers free drone pilot training to youth from farmer families. The program covers modern farming techniques and provides an official drone pilot license upon completion, enhancing employment opportunities in agriculture.