Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > पैसे भरून सोलर मिळाले नाही, पंपात बिघाड झालाय, कंपनी योग्य नाही, इथं करा रीतसर तक्रार 

पैसे भरून सोलर मिळाले नाही, पंपात बिघाड झालाय, कंपनी योग्य नाही, इथं करा रीतसर तक्रार 

Latest News Did not get solar after paying, pump is broken, company is not suitable, file formal complaint here | पैसे भरून सोलर मिळाले नाही, पंपात बिघाड झालाय, कंपनी योग्य नाही, इथं करा रीतसर तक्रार 

पैसे भरून सोलर मिळाले नाही, पंपात बिघाड झालाय, कंपनी योग्य नाही, इथं करा रीतसर तक्रार 

Solar Pump Yojana : शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत अनेक शेतकरी नाराजी दर्शवत आहेत.

Solar Pump Yojana : शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत अनेक शेतकरी नाराजी दर्शवत आहेत.

Solar Pump Yojana  : मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत अनेक शेतकरी नाराजी दर्शवत आहेत. सोलर कंपनी चांगली नाही, सोलरमधील बिघाड, अनेकांना सोलरच मिळाले नाहीत, यासह इतर तक्रारी शेतकरी करीत आहेत. अशावेळी नेमके काय करावे, कुठे तक्रार करावी, हे आपण समजून घेऊयात. 

सौर कृषीपंपाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. यासाठी महावितरणचे टोल फ्री क्रमांक १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राकडे आलेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल. सदर एजन्सीकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.


तक्रार कशी करावी?
ऑनलाइन :
महावितरणच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन 'सौर पंप तक्रार' (Solar Pump Complaint) या पर्यायावर क्लिक करा. 
माहिती : तक्रार नोंदवताना लाभार्थी क्रमांक, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका आणि गाव ही माहिती आवश्यक आहे. 
फोन/ॲप : टोल-फ्री क्रमांक : १८००-२३३ -३४३५ 
पाच वर्षांची हमी : सौर कृषी पंप बसवल्यानंतर पाच वर्षे देखभालीची (Maintenance) जबाबदारी संबंधित कंपनीची असते. 

तक्रार करण्यापूर्वी काय तपासावे?
पंप काम करत नसल्यास कंट्रोलरवरील त्रुटी कोड (Error Code) आणि लाइट तपासा. 
पॉवर इनपुट तपासा. सर्व वायर जोड्या (Connections) योग्य आहेत याची खात्री करा. 

एक उदाहरण पाहुयात... 
बोदवड तालुक्यातील निमखेड येथील शेतकरी पुखराज जैन यांनी डिसेंबर २०२४ मध्ये संबंधित रक्कम भरली होती. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना अद्याप सोलर पंप मिळालेला नाही. सोलर पंप मिळावा यासाठी त्यांनी वारंवार अर्ज व पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

Web Title : पैसे देने के बाद भी सोलर नहीं मिला? पंप में खराबी? ऐसे करें शिकायत!

Web Summary : सोलर पंप की समस्या से परेशान हैं? टोल-फ्री नंबर या ऑनलाइन पोर्टल के माध्यम से महावितरण के साथ शिकायत दर्ज करें। सुनिश्चित करें कि कनेक्शन सही हैं, त्रुटि कोड की जांच करें। कंपनियां पांच साल तक रखरखाव के लिए जिम्मेदार हैं। उदाहरण: किसान ने 2024 में भुगतान किया, लेकिन अभी भी पंप का इंतजार है।

Web Title : No Solar After Payment? Pump Problems? Here's How to Complain!

Web Summary : Frustrated with solar pump issues? Register complaints with Mahavitran via toll-free numbers or the online portal. Ensure connections are correct, check error codes. Companies are responsible for maintenance for five years. Example: farmer paid in 2024, but still awaiting pump.