Dharangrasta Dakhala : 'धरणग्रस्त' (Dharanagrast) म्हणजे धरण प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली गेली आहे आणि त्यांना पुनर्वसित केले गेले आहे, अशा लोकांना 'धरणग्रस्त व्यक्ती' असे म्हणतात.
प्रकल्पग्रस्तांना 'प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र' दिले जाते, जे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देते. तुम्ही प्रकल्पग्रस्त असल्यास, या प्रमाणपत्रासाठी आपले सरकार वेबसाइटवर अर्ज करू शकता.
अर्ज प्रक्रिया :
पात्रता तपासा : अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही प्रकल्पामुळे विस्थापित झाले आहात आणि तुमचा पुनर्वसनाचा हक्क आहे याची खात्री करून घ्या.
- त्यांनतर तलाठी यांचे होल्डींग प्रमाणपत्र घेणे.
- तहसिल कार्यालय येथे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करुन तहसिलदार यांचे कडील होल्डींग प्रमाणपत्र मिळवावे.
- तहसिलचे होल्डींग प्रमाणपत्र घेतल्यानंतर आपल्या तालुक्यातील उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्जासह, आवश्यक कागदपत्र व स्टँपपेपरवरील शपथपत्र, संमतीपत्र, वंशावळ सादर करावे.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करा : या प्रकारचा दाखला मिळवण्यासाठी, तुम्हाला संबंधित सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज दाखल करावा लागेल.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी, आपल्या अर्जाची तपासणी करुन, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (Prakalpgrast Pramanpatra -Dharangrast Pramanpatra) निर्गमित करतील.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
१) विहीत नमुन्यात अर्ज
२) सबंधित विशेष भुअर्जन अधिकारी यांचे प्रमाणपत्र
३) घर संपादन केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठ अ चा उतारा
४) ७/१२ चा उतारा ज्या वर्षी जमीन संपादीत केली त्या वर्षाचा
५) राज्यात व शेजारच्या राज्यात जमीन शिल्लक नसल्याचा प्रतिज्ञालेख १००/- रु स्टॅम्पवर
६) भुसंपादन कलम ४ (१) च्या नोटीसची मुळ प्रत
७) राशन कार्डची झेरॉक्स प्रत किंवा तहसिलदार यांचेकडील कुटुंबाचे प्रमाणपत्र
८) टी.सी ची झेरॉक्स प्रत
९) मुळ प्रकल्पग्रस्त मय्यत असेल तर मयताचा दाखला, वारसाचा दाखला (पोलीस पाटील) सर्व वारसाचा संमतीलेख १००/- रु स्टॅम्पवर
१०) दत्तकपुत्र असल्यास दत्तक विधानाचा लेख
११) दत्तकपुत्राने नविन धारण केलेल्या नांवाची महाराष्ट्र शासन राजपत्राची मुळ प्रत
१२) कार्यकारी अभियंता यांचे प्रमाणपत्र (सरळ खरेदी करीता)
१३) सरळ खरेदीची क्षेरॉक्स प्रत व वरील आवश्यक कागदपत्रे
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या तलाठी कार्यालयात भेट द्या.