Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, कांदा प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर 

कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, कांदा प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर 

Latest news Decision on onion subsidy will be taken in the cabinet says Minister Girish Mahajan | कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, कांदा प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर 

कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, कांदा प्रश्नांवर मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर 

Kanda Market Issue : शेतकऱ्यांचे अर्थचक्र कांदा पिकावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

Kanda Market Issue : शेतकऱ्यांचे अर्थचक्र कांदा पिकावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कांदा पिकावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

बागलाण तालुक्यातील मुंजवाड, खमताणे, नवे निरपूर, जुने निरपूर, तिळवण, नवेगाव व आदी परिसरात उन्हाळी कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रांगडा कांदा हा उन्हाळी कांद्याच्या एक महिना आधी तयार होतो, तेव्हा तो साधारणताः फेब्रुवारी महिन्यात मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होतो. 

आता रांगडा कांदा तयार झाला आहे. त्याच्या काढणीचे काम सुरू आहे. परंतु कवडीमोल भावाने विकला जात असल्याने रांगडा कांद्याची विक्री करून कांद्यावर खर्च केलेला पैसा देखील निघत नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

कांदा अनुदानाबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय
कांदा अनुदानाबाबत शेतकऱ्यांची मागणी रास्त असून, त्याबाबत कॅनिटेमध्येच निर्णय घेतला जाईल. उत्तर महाराष्ट्रात आखाती देशात उत्तर महाराष्ट्रातून कांदा, द्राक्ष, केळी जातात. त्या देशांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. तेथे आपण काही करू शकत नाही. परिस्थितीच अशी आहे की, काही करू शकत नाही. परिस्थिती गंभीर आहे, दुबईवरही अटॅक होत आहे.

निर्यातीत झालेली प्रचंड घट, कांद्याच्या गुणवत्तेत पडलेला फरक यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- हरि अण्णा जाधव, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा.

Web Title : प्याज सब्सिडी पर कैबिनेट में निर्णय: मंत्री गिरीश महाजन का उत्तर

Web Summary : प्याज की कीमतों में गिरावट से किसान परेशान हैं। सब्सिडी पर कैबिनेट में निर्णय संभावित है। निर्यात में कमी और गुणवत्ता की समस्या से संकट बढ़ गया है। किसान सरकार से उचित मूल्य की मांग कर रहे हैं।

Web Title : Onion Subsidy Decision in Cabinet: Minister Girish Mahajan's Response

Web Summary : Onion farmers face losses due to plummeting prices. A cabinet decision on subsidies is expected. Export decline and quality issues exacerbate the crisis. Farmers seek government intervention for fair prices.