Lokmat Agro >शेतशिवार > Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

latest news Crop Loan: Farmers will get crop loan approval from home; Know the application process | Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Crop Loan : शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम अकोला जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. (Crop Loan)

Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम अकोला जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे. (Crop Loan)

शेअर :

Join us
Join usNext

Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. (Crop Loan)

या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम अकोला जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत आहे.(Crop Loan)

आता शेतकऱ्यांना बँकेच्या फेऱ्या मारायची गरज नाही. फक्त मोबाईलवर काही क्लिक करून घरबसल्या मिळणार पीक कर्ज मंजुरी. केंद्र व राज्य सरकारच्या नव्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Crop Loan)

शेतकऱ्यांना पीक कर्ज जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र सरकारचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. (Crop Loan)

या उपक्रमांतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) व पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम अकोला जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहे. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नितीन घोरे व विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Crop Loan)

कर्ज प्रक्रिया आता ऑनलाइन

या मोहिमेत ॲग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता कागदपत्रांचा त्रास न होता, बँकांच्या फेऱ्या टाळून घरबसल्या कर्ज मंजुरी मिळणार आहे.

यासाठी आधार क्रमांक मोबाइलशी लिंक असणे आवश्यक आहे.

शेतकरी ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

सध्या ही सुविधा केवळ स्वतः च्या नावावर जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.

पारदर्शक प्रक्रिया

या उपक्रमात ॲग्रिस्टॅक डेटा प्रणालीचे जनसमर्थ पोर्टलशी एकात्मिकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक, सुलभ आणि कागदपत्रविरहित पद्धतीने पीक कर्ज मिळणार आहे.

कर्जासाठी आवश्यक अटी

शेतकऱ्याचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक

शेतकरी ॲग्रिस्टॅक (Farm Registry) मध्ये नोंदणीकृत असावा

जमीन स्वतःच्या नावावर असावी

अर्ज करण्याची पद्धत

शेतकऱ्यांनी www.jansamarth.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाइल क्रमांक वापरून नोंदणी करावी.

नंतर Agri Loan – Kisan Credit Card हा पर्याय निवडावा.

जिल्ह्याचे नाव भरून आधार क्रमांक टाकून ई-केवायसी तपासणी करावी.

वैयक्तिक, बँक, आर्थिक आणि जमिनीचे तपशील भरून अर्ज सादर करावा.

शासन व बँकांच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले जाईल.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना पारदर्शक आणि कागदपत्रविरहित पद्धतीने घरबसल्या कर्ज मंजुरी मिळणार आहे. - अजित कुंभार, जिल्हाधिकारी, अकोला.

पात्र शेतकऱ्यांनी तातडीने जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. - डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

हे ही वाचा सविस्तर :Gopinath Munde Sugarcane Workers Scheme : ऊसतोडणी दरम्यान अपघात झाला तर किती मदत मिळते? वाचा सविस्तर

Web Title: latest news Crop Loan: Farmers will get crop loan approval from home; Know the application process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.