Crop Loan : रब्बी हंगामाची चाहूल लागताच जिल्ह्यातील सहकारी संस्था, पतसंस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीककर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.(Crop Loan)
बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या तयारीसाठी पीककर्ज वितरण सुरू झाले आहे. मात्र, बँकांच्या विलंब आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. शासनाने वेळेत कर्ज वाटपासाठी आदेश दिले असले तरी अनेक ठिकाणी प्रक्रिया हळू गतीने सुरू आहे.(Crop Loan)
यंदा कृषी विभाग आणि जिल्हा केंद्रीय बँकेने ५०० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि सिंचनासाठी तातडीने निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Crop Loan)
विलंब आणि अडथळे
अनेक ठिकाणी कर्ज प्रक्रियेत विलंब होत आहे.
रब्बी हंगामात पेरणीपूर्व तयारीसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो, मात्र बँकांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडते.
शासनाने बँकांना निश्चित कालावधीत कर्जवाटपाचे आदेश दिले असले, तरी दस्तऐवज तपासणी, सर्च रिपोर्ट, ७/१२ उतारे आणि चुकत्या प्रमाणपत्रांमुळे प्रक्रिया रेंगाळते.
कर्ज वितरण
कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पीककर्जासाठी केंद्र वा राज्य शासन थेट निधी पुरवत नाही. हा निधी बँकांच्या आर्थिक तरतुदीतून दिला जातो.
शेती हा उच्च जोखमीचा क्षेत्र असल्याने काही बँका कर्ज वितरणात अनुत्साही असतात.
शासन दरवर्षी लक्ष्यांक ठरवते, तरी अनेक बँका ते पूर्ण करण्यात अपयशी ठरतात, परिणामी आकडेवारीत तफावत निर्माण होते.
शेतकऱ्यांची अडचण
कागदपत्रांच्या कटकटीमुळे शेतकऱ्यांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात.
काही ठिकाणी प्रक्रिया आठवड्यांपर्यंत लांबते, तर अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे कामकाज अधिकच संथ झाले आहे.
बँकांची अनास्था आणि संभाव्य परिणाम
जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना पुरेसे सहकार्य मिळत नसल्याची तक्रारी वाढल्या आहेत.
काही शेतकरी वैतागून सावकारांकडे वळत असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे.
पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट
यंदा ५८ हजार शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शासनाने बँकांवर नियंत्रण ठेवून वेळेत आणि सुलभ पद्धतीने कर्ज वितरण व्हावे, अन्यथा अनेक शेतकरी सावकारांकडे वळतील.- कौशलेन्द्रकुमार सिंग, जिल्हा प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक
कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली पाहिजे, नाहीतर शेतकरी फसण्याची परिस्थितीत येतात.- नारायण खंडागळे, शेतकरी, पळसखेड भट
रब्बी हंगामासाठी पीककर्ज वितरण सुरू झाले आहे, तरी बँकांच्या विलंब आणि कागदपत्रांच्या अडचणींमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने कठोर धोरण आखून प्रक्रिया सुलभ करावी, अन्यथा शेतकरी सावकारांकडे वळू शकतात.
हे ही वाचा सविस्तर : Banana Market : केळीच्या गणिताची घडी बसेना; काय आहे कारण वाचा सविस्तर
