Crop Damage : मराठवाड्यातील अतिवृष्टी, पूर आणि सलग नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे.(Crop Damage)
एकूण सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या मदतीचे आदेश राज्य सरकारने काढले असून, आतापर्यंत २९ लाख ३३ हजार बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाचे काम ५० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.(Crop Damage)
अनुदान वाटपाची गती वाढविण्यासाठी, केवायसी प्रक्रियेत वेळ न दवडता थेट अॅग्रीस्टॅक नोंदणीनुसार अनुदान वितरित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.(Crop Damage)
बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा
गुरुवारी झालेल्या बैठकीत महसूल, अनुदान वाटप, नगरपालिका निवडणुका, पदवीधर मतदार नोंदणी, महसूल व गौणखनिज करवसुली, शासकीय योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीस विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे २ हजार ८६ कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. पिकांच्या नुकसानीपोटी ४ हजार ५१ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून, उर्वरित प्रस्तावही त्वरीत पाठवावेत, असे आयुक्तांनी सांगितले.
अतिवृष्टीची वस्तुस्थिती तपासण्यासाठी केंद्रीय पथकाची भेट
केंद्रीय पथकाने नुकतेच मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून, एनडीआरएफच्या निकषांनुसार केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. राज्य सरकारने आधीच केंद्राच्या नियमांनुसार मदत जाहीर केली आहे.
रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या. अनुदान वाटपात कोणतीही अडचण येऊ नये. केवायसी प्रक्रियेत वेळ न घालवता, अॅग्रीस्टॅक डेटानुसार निधी वितरित करा.- जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त
