Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा 'तो' शासन निर्णय रद्द, मंत्रालय बैठकीत घेतलेला नवा निर्णय काय? 

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा 'तो' शासन निर्णय रद्द, मंत्रालय बैठकीत घेतलेला नवा निर्णय काय? 

Latest news Compensation for Possession Rights to be Paid in Accordance with the Act; Relief for Project-Affected Persons | प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा 'तो' शासन निर्णय रद्द, मंत्रालय बैठकीत घेतलेला नवा निर्णय काय? 

प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा 'तो' शासन निर्णय रद्द, मंत्रालय बैठकीत घेतलेला नवा निर्णय काय? 

Project-Affected GR : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक पार पडली.

Project-Affected GR : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक पार पडली.

मुंबई : प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा शासन निर्णय रद्द करून पुनर्वसन अधिनियमाप्रमाणेच कब्जेहक्काची रक्कम भरून घेण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत घेण्यात आला.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बैठक पार पडली. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, प्रकाश भातुसे आणि अधिकारी उपस्थित होते.

१४ ऑक्टोंबर २०२१ रोजी वर्ग दोनची जमीन वर्ग एक करणे व कब्जाहक्काची रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जमिनीचे सपाटीकरण, मोजणी, यावर जो खर्च झाला, तो प्रकल्पग्रस्तांकडून व्याजासह वसूल करण्याची तरतूद निर्णयात होती. 

बैठकीतील ठळक निर्देश
प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करताना पुनर्वसन आराखड्यात कोणताही बदल केला जाऊ नये, इथून पुढे पुनर्वसन आराखड्याप्रमाणेच जमिनीचे वाटप केले जाईल. प्रकल्पग्रस्तांना १ लाख ६५ हजार प्रमाणे घर बांधणी अनुदान देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवावा.

प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्रात दिलेल्या जमिनीला पाणी देण्यासाठी योजना तातडीने पूर्ण करा. चांदोली अभयारण्यग्रस्तांना पुनर्वसन कायदा लागू न करताच त्यांचे संपादन केले गेले, ही चूक प्रशासनाच्या वतीने झाली आहे. यामुळे हजारो प्रकल्पग्रस्त बेकायदा ठरवले गेले. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन ठप्प झाले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Web Title : परियोजना प्रभावितों के खिलाफ अन्यायपूर्ण सरकारी संकल्प रद्द: नया निर्णय

Web Summary : परियोजना प्रभावित लोगों को नुकसान पहुंचाने वाला एक निर्णय मंत्रालय की बैठक में रद्द कर दिया गया। निर्णय में पुनर्वास अधिनियम के आधार पर भूमि मुआवजा शामिल है। प्रमुख निर्देशों में पुनर्वास योजना के अनुसार भूमि आवंटन और आवास अनुदान शामिल हैं। चंदोली अभयारण्य के पीड़ितों के लिए कार्रवाई की योजना बनाई गई है, जिनका पुनर्वास प्रशासनिक त्रुटियों के कारण रुक गया था।

Web Title : Unjust Government Resolution Against Project Affected People Cancelled: New Decision

Web Summary : A decision harming project-affected people was revoked in a ministry meeting. The decision involves land compensation based on the rehabilitation act. Key directives include land allocation as per the rehabilitation plan and housing grants. Action is planned for Chandoli sanctuary victims, whose resettlement stalled due to administrative errors.