Chia Cultivation Scheme : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया लागवडीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्ह्यात 'कृषी समृद्धी' योजनेंतर्गत एकूण ३ हजार ७४५ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. (Chia Cultivation Scheme)
चिया लागवडीचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडविणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली. (Chia Cultivation Scheme)
या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात ५३५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना चिया पिकाच्या प्रात्यक्षिकासाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रति एकर जास्तीत जास्त ६ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना मिळेल.(Chia Cultivation Scheme)
या अनुदानामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात चिया पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड करता येईल, असे कृषी विभागाने सांगितले.(Chia Cultivation Scheme)
योजनेअंतर्गत लागवड केलेल्या क्षेत्राचा जिओ-टॅग फोटो आणि सहायक कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. या माध्यमातून पारदर्शकता राखली जाईल आणि अनुदान वितरणात कोणतीही अनियमितता होणार नाही, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.(Chia Cultivation Scheme)
चिया हे तेलबिया प्रकारातील आरोग्यदायी आणि उच्च पौष्टिक मूल्य असलेले पीक असल्याने त्याला सध्या बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे या योजनेमुळे जिल्ह्यात चिया लागवडीचे प्रमाण वाढेल, तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नही बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अकोला जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, या योजनेचा लाभ घेऊन चिया लागवडीसारख्या उच्च मूल्य पिकांद्वारे शेतीला नवी दिशा द्यावी.
चिया लागवडीसाठी अर्ज प्रक्रिया
अर्ज कोठे करायचा : आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात किंवा महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा.
वेबसाइट : https://www.mahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक कागदपत्रे
७/१२ उतारा (जमिनीचा दाखला)
आधारकार्ड
बँक पासबुक झेरॉक्स
लागवड केलेल्या क्षेत्राचे फोटो (जिओ-टॅग केलेले)
सहायक कृषी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र (लागवड केल्याचे)
मोबाइल नंबर
पात्रता निकष
* शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असावा.
* स्वतः च्या जमिनीत चिया लागवड केलेली असावी.
* लागवड प्रात्यक्षिक पद्धतीने असणे आवश्यक.
अनुदानाचे स्वरूप
प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार.
प्रति एकर जास्तीत जास्त ६ हजार इतके प्रोत्साहनपर अनुदान.
अर्ज केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी तुमची लागवड तपासतील.
जिओ-टॅग फोटो आणि प्रमाणपत्र सादर केल्यावर अनुदान मंजूर होईल.
अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल.
