Agriculture News : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे" या योजनेअंतर्गत त्रुटी पूर्तता करुन पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात ६ लाख ८३ हजार ९७० रुपये निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे" या योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत व वितरीत करावयाच्या निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
योजनेचे नाव
- अर्थसंकल्पित निधी रु.९९.९४ लाख
- चालू वर्षी वितरीत निधी ३८.८८७३ लाख
- आता वितरीत करावयाचा निधी ६ लाख ८३ हजार ९७०
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे. या शासन निर्णयाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी पात्र काजू उत्पादक लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर महाराष्ट्र राज्य काजू मंडळामार्फत थेट जमा करण्यात येईल.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे" या योजनेस मान्यता दिलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन २०२४ च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बी साठी प्रति किलो १० रुपये याप्रमाणे किमान ५० किलो व कमाल २००० किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे.
