Agriculture Scheme : वाशिम जिल्हा प्रशासनाकडून विविध लाभ योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सेसफंड व वनमहसुल योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागासवर्गीय नागरिक व आदिवासी शेतकऱ्यांसाठी विविध लाभ उपलब्ध करण्यात आला आहे.
उपलब्ध लाभ :
- स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीन (पुरुष व महिला)
- मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री
- मोटार पंप वितरण
- तुषारसंच / Sprinkler Set
- मागासवर्गीय वस्तीतील समाजमंदिरांसाठी अभ्यासिका
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण
- वनमहसुल 7 टक्के योजनेत आदिवासी शेतकऱ्यांना ताडपत्री
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 19 डिसेंबर 2025
इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावेत.
पुढील प्रक्रिया : संबंधित पंचायत समितीमार्फत पडताळणी केलेले अर्ज 24 डिसेंबर 2025 पर्यंत जिल्हा समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे सादर करावेत.
