Pack House Unit : महाराष्ट्र शासन, जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत, पुणे जिल्ह्यातील पथदर्शी शहरी अन्न पुरवठा साखळी उपप्रकल्पात एकात्मिक पॅकहाऊस युनिट (Pack House Unit) उभारणीसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) इच्छुक व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPC) आणि इतर संस्थांसाठी ही एक उत्तम संधी आहे. याद्वारे एफपीसीच्या काढणीपश्चात व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील.
ठळक बाबी :
प्रकल्प- एकात्मिक पॅक हाऊस युनिटची उभारणी
स्थळ- पुणे
अंमलबजावणी- प्रकल्प अंमलबजावणी कक्ष- कृषी, स्मार्ट प्रकल्प, महाराष्ट्र शासन
पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया- अधिक माहिती, पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया, तसेच इतर कागदपत्रे प्रकल्पाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. https://smart-mh.org/CBO या सेक्शनमध्ये अर्बन “अन्न मार्गदर्शक तत्त्वे” या शीर्षकाखाली निविदा, अर्ज करण्याची प्रक्रिया, इतर दस्तावेजांबाबत माहिती उपलब्ध आहे.
तसेच, या प्रस्तावासाठीच्या अटी शर्ती पुढील लिंकवर सविस्तर वाचा : https://shorturl.at/c4XS2
अधिक माहितीसाठी संपर्क-
- जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे (पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ- 9665164666)
- विभागीय अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, पुणे (पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ- 9420920936)
प्रस्ताव सादर करण्याची पद्धत :
आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव “जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट प्रकल्प, कृषी विभाग, सहावा मजला, डीटीसी मॉल, एरंडवणे, पुणे – ४११००१” या पत्त्यावर स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पोस्ट, कुरिअरद्वारे पाठवावेत.
प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख : २३ मे, २०२५ सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत.
सर्व पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना विनंती आहे की या संधीचा लाभ घ्यावा आणि अंतिम मुदतीपूर्वी आपले प्रस्ताव सादर करावेत. या उपक्रमामुळे आपल्या एफपीसीच्या कामकाजात आणि शेतकरी समुदायाला निश्चितच फायदा होईल.
या संधीचा लाभ घेण्यासाठी ही माहिती कृपया आपल्या संपर्कातील सर्व शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठवा!