Lokmat Agro >शेतशिवार > Vegetbale Farming : ऑगस्ट महिन्यात 'या' भाजीपाल्याची लागवड करा, चांगला नफा कमावता येईल!

Vegetbale Farming : ऑगस्ट महिन्यात 'या' भाजीपाल्याची लागवड करा, चांगला नफा कमावता येईल!

Latest news bhajipala lagvad Plant these vegetables in August, you can earn good profits! | Vegetbale Farming : ऑगस्ट महिन्यात 'या' भाजीपाल्याची लागवड करा, चांगला नफा कमावता येईल!

Vegetbale Farming : ऑगस्ट महिन्यात 'या' भाजीपाल्याची लागवड करा, चांगला नफा कमावता येईल!

Vegetbale Farming : या महिन्यात नियोजन आखून काही भाजीपाला पिकांची लागवड (Vegetbale Farming) करता येऊ शकते.

Vegetbale Farming : या महिन्यात नियोजन आखून काही भाजीपाला पिकांची लागवड (Vegetbale Farming) करता येऊ शकते.

शेअर :

Join us
Join usNext

Vegetbale Farming :  ऑगस्ट महिन्यात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे पावसासाठी योग्य अशी पिके घेणे आवश्यक असते. या महिन्यात नियोजन आखून काही भाजीपाला पिकांची लागवड (Vegetbale Farming) करता येऊ शकते. यामध्ये विशेष नियोजन करून चांगला नफा कमावता येऊ शकतो. 

टोमॅटो
ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची लागवड करता येते. ते तयार होण्यासाठी ६०-९० दिवस लागतात. टोमॅटो पिकाला देखील अनेकदा चांगले मार्केट मिळण्याची शक्यता असते. योग्य नियोजन केल्यास, चांगल्या वाणाची निवड केल्यास टोमॅटो शेतीही फायदेशीर ठरू शकते. 

दुधी भोपळा
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बाजारात विकल्या जाणाऱ्या दुधी भोपळ्याची लागवड करण्यासाठी ऑगस्ट महिना चांगला असतो. शेत नांगरल्यानंतर वाफे तयार करा. आता बांबू आणि दोरीच्या मदतीने मंडप तयार करावा लागतो. कारण दुधी भोपळ्याच्या झाडांना वाढण्यासाठी पुरेशी जागा लागते. मंडप बनवून, त्यावर भोपळ्याच्या वेळी पसरतात. ज्यामुळे भोपळे तोडणे देखील सोपे होते.

वांगी
वांग्यापासून अनेक अन्नपदार्थ बनवले जातात, त्यामुळे त्याची बाजारपेठेतील मागणी खूप जास्त आहे, जी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. वांग्याची लागवड आणि काळजी टोमॅटोसारखीच आहे. ते तयार होण्यासाठी देखील सुमारे ३ महिने लागतात. बियाण्यांऐवजी, रोपवाटिकेतून आणलेल्या चांगल्या दर्जाच्या रोपांची निवड करावी.

गाजर
ऑगस्ट महिन्यातही गाजराची लागवड खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. गाजर ही एक कंदयुक्त भाजी आहे. गाजर लागवडीसाठी, शेत नांगरून सलग लहान कड्या करा. आता दोन कड्यांमधील रिकाम्या जागेत २०-२० सेमी अंतरावर बियाणे लावा. माती सुकण्यापूर्वी पाणी द्या. ०१ महिन्यानंतर रोपे वाढतील, नंतर माती खोदून घ्या. ९०-१०० दिवसांनी गाजराचे पीक तयार होते.

Web Title: Latest news bhajipala lagvad Plant these vegetables in August, you can earn good profits!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.