Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Baliraja Shet Panand Road Scheme : 'घनसावंगी पॅटर्न' ठरतोय आदर्श; २०५ किमी शेतरस्त्यांचे होणार मजबुतीकरण

Baliraja Shet Panand Road Scheme : 'घनसावंगी पॅटर्न' ठरतोय आदर्श; २०५ किमी शेतरस्त्यांचे होणार मजबुतीकरण

latest news Baliraja Shet Panand Road Scheme: 'Ghansawangi pattern' is becoming the ideal; 205 km of roads will be strengthened | Baliraja Shet Panand Road Scheme : 'घनसावंगी पॅटर्न' ठरतोय आदर्श; २०५ किमी शेतरस्त्यांचे होणार मजबुतीकरण

Baliraja Shet Panand Road Scheme : 'घनसावंगी पॅटर्न' ठरतोय आदर्श; २०५ किमी शेतरस्त्यांचे होणार मजबुतीकरण

Baliraja Shet Panand Road Scheme : जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Baliraja Shet Panand Road Scheme)

Baliraja Shet Panand Road Scheme : जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Baliraja Shet Panand Road Scheme)

जालना : घनसावंगी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून 'घनसावंगी पॅटर्न'ने (Ghansawangi Pattern) तयार करण्यात आलेल्या शेत-पाणंद रस्त्यांना आता महाराष्ट्र शासनाची साथ मिळणार आहे.(Baliraja Shet Panand Road Scheme)

समृद्धी साखर कारखान्याने स्वखर्चातून तयार केलेल्या तब्बल २०५ किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांचे 'मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते' योजनेअंतर्गत मजबुतीकरण व खडीकरण करण्यात येणार आहे. (Baliraja Shet Panand Road Scheme)

या निर्णयामुळे घनसावंगी, अंबड आणि जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यानंतर या प्रस्तावाला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून घनसावंगी विधानसभा क्षेत्रात राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून या शेतरस्त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे.

कारखान्याने स्वखर्चातून उघडले शेतरस्ते

समृद्धी साखर कारखान्याने ग्रामीण भागातील शेत-पाणंद रस्ते दर्जेदार करण्याचे ध्येय ठेवून सन २०२३-२४ दरम्यान स्वखर्चातून २०५ किमी रस्त्यांचे मातीकाम पूर्ण केले.

घनसावंगी विधानसभा क्षेत्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले तरी योग्य रस्त्यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

कारखान्याच्या पुढाकारातून शेतकऱ्यांमधील आपसी वाद मिटवून अनेक गावांमध्ये शेतरस्ते खुले करण्यात आले.

आता राज्य शासनाच्या 'बळीराजा शेत-पाणंद रस्ते' योजनेतून या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि खडीकरण करण्यात येणार असल्याने हे रस्ते कायमस्वरूपी दर्जेदार होणार आहेत.

तीन तालुक्यांतील रस्त्यांना लाभ

या योजनेअंतर्गत तीन तालुक्यांतील शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.

घनसावंगी तालुका : १०२ किमी

अंबड तालुका : ६८.५ किमी

जालना तालुका : ३५.५ किमी

एकूण २०५ किलोमीटर शेत-पाणंद रस्ते मजबूत होणार असल्याने परिसरातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

शेतमाल वाहतुकीस होणार मोठी मदत

शेत-पाणंद रस्ते चांगले असतील तरच शेतमाल वेळेवर बाजारात पोहोचू शकतो. विशेषतः ऊस, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या वाहतुकीसाठी शेतरस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. यंदाच्या गळीत हंगामात या रस्त्यांचा मोठा फायदा झाल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे.

समृद्धी साखर कारखान्याने सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ग्रामीण भागातील शेतरस्ते तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

आता शासनाच्या मदतीने या रस्त्यांचे मजबुतीकरण होणार असल्याने घनसावंगी पॅटर्न राज्यभरात आदर्श ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून तातडीच्या कारवाईचे निर्देश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सतीश घाटगे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच या शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील शेती वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या उपक्रमामुळे घनसावंगी, अंबड आणि जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Land Acquisition : भूसंपादनातील विलंब थांबणार? सरकारचा मोठा निर्णय जाहीर

अधिक वाचा : Agricultural Land : 'एनए'चा गुंता संपला! महसूल-नगररचना दुहेरी प्रक्रिया बंद; नवा नियम लागू

Web Title : घनसावंगी पैटर्न: बलिराजा शेत पाणंद सड़क योजना के लिए आदर्श, 205 किमी मजबूत होंगे

Web Summary : खेत सड़कों के लिए 'घनसावंगी पैटर्न' को सरकारी समर्थन मिला। समृद्धि चीनी कारखाने द्वारा निर्मित 205 किमी सड़कों को बलिराजा शेत पाणंद सड़क योजना के तहत मजबूत किया जाएगा, जिससे घनसावंगी, अंबड और जालना के किसानों को लाभ होगा। यह परियोजना कृषि उपज परिवहन में सुधार करेगी, जो राज्य के लिए एक उदाहरण स्थापित करेगी।

Web Title : Ghansawangi Pattern: Ideal for Baliraja Shet Panand Road Scheme, 205 km to strengthen

Web Summary : The 'Ghansawangi Pattern' for farm roads gets government support. 205 km of roads built by Samruddhi Sugar Factory will be strengthened under the Baliraja Shet Panand Road Scheme, benefiting farmers in Ghansawangi, Ambad and Jalna. This project will improve farm produce transportation, setting an example for the state.