Join us

Avakali Paus: शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी… पण वेळेआधी आल्याने झाली हानी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:15 IST

Avakali Paus : मे महिन्यातच अवकाळी पावसाने (Avakali Paus) धडक दिली, पण सोबत चिंता घेऊन आला. मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. संत्रा, पपईपासून ते भुईमूग आणि मिरचीपर्यंत अनेक पिके उद्ध्वस्त झाली असून, आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. वाचा सविस्तर

Avakali Paus : मे महिन्यातच अवकाळी पावसाने (Avakali Paus) धडक दिली, पण सोबत चिंता घेऊन आला! मंगरूळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. 

संत्रा, पपईपासून ते भुईमूग आणि मिरचीपर्यंत अनेक पिके उद्ध्वस्त (Crop Damage) झाली असून, आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

मंगरूळपीर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने (Avakali Paus) बुधवारी (२१ मे) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह जोरदार हजेरी लावली. या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Crop Damage)

गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असतानाही, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती बिकट झाली. यामुळे पपई, ज्वारी, भुईमूग, मिरची, टोमॅटो यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Avakali Paus)

कवठळ येथील शेतकरी विनायक भगत यांच्या पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, भुईमूग पिके (Crop Damage) भिजून खराब झाली आहेत. गुरांसाठी साठवलेला चारा देखील वापरण्यायोग्य राहिलेला नाही. (Avakali Paus)

संत्रा उत्पादकांनाही फटका

पश्चिम विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मृगबहारासाठी झाडांना पाण्याचा ताण देण्याची प्रक्रिया या हवामानामुळे खंडित झाली असून, संत्रा उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हवामानाच्या अचानक बदलामुळे अन्नद्रव्य संचय प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला असून, मृगबहाराची शक्यता कमी झाली आहे.

प्रशासनाकडून त्वरित मदतीची मागणी

शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

निसर्गाची चपळता आणि शेतकऱ्यांच्या पुढे आव्हान

मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात काहीसा दिलासा झाला असला तरी शेतकऱ्यांच्या संकटात मात्र भर पडली आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपात तग धरत शेतीचे नियोजन करणे हेच शेतकऱ्यांच्या पुढे आव्हान आहे.  

शेतकऱ्यांना सल्ला

मृगबहारासाठी बागा ताणावर सोडल्या होत्या. मात्र, हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आंबिया बहार घेण्याचा विचार करावा. यासंदर्भात अधिक मार्गदर्शनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. - सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी

हे ही वाचा सविस्तर : Avakali Paus: पावसाने फक्त माती नाही ओली केली, तर स्वप्नंही भिजवली! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीवाशिमहवामान अंदाजपाऊसपीक