Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Ativrushti Anudan : २ वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २२ कोटी जमा

Ativrushti Anudan : २ वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २२ कोटी जमा

latest news Ativrushti Anudan: 2 years of wait is over! 22 crores directly deposited in the accounts of 'this' farmers | Ativrushti Anudan : २ वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २२ कोटी जमा

Ativrushti Anudan : २ वर्षांची प्रतीक्षा संपली! 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २२ कोटी जमा

Ativrushti Anudan : दोन वर्षांपासून रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना २२ कोटींचा निधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ई-केवायसी न केल्याने अजूनही काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत.(Ativrushti Anudan)

Ativrushti Anudan : दोन वर्षांपासून रखडलेले अतिवृष्टीचे अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना २२ कोटींचा निधी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ई-केवायसी न केल्याने अजूनही काही शेतकरी लाभापासून वंचित आहेत.(Ativrushti Anudan)

सोयगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची होळी आनंदाची ठरणार आहे. २०२४-२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान अखेर गुरुवारी (दि. २६) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. (Ativrushti Anudan)

सुमारे २४ हजार ३२८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.(Ativrushti Anudan)

दोन वर्षांची प्रतीक्षा संपली

२०२४-२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयगाव तालुक्यातील २८ हजार ५७७ शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना देण्यात येणारे २२ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान विविध कारणांमुळे रखडले होते.

निधी उपलब्ध होण्यास झालेला विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना जवळपास दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

मात्र, गुरुवारी अचानक शेतकऱ्यांच्या मोबाइलवर खात्यात रक्कम जमा झाल्याचे संदेश आल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण पसरले.

आंदोलनांनंतर मिळाला दिलासा

हे थकीत अनुदान तातडीने मिळावे यासाठी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

तहसील कार्यालयावर आंदोलने, निवेदने आणि बैठका यांमुळे प्रशासनावर दबाव वाढला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले.

अनुदान वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

बनोटी मंडळातही निधी जमा

सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळातील २ हजार ८२२ शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी १६ लाख ७९ हजार ४२८ रुपये जमा झाले आहेत. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

४,२०० शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले असले तरी अद्याप सुमारे ४,२०० शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

यामागील प्रमुख कारण काय?

ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही त्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी.

प्रशासनाचे आवाहन

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,

* बँक खात्याशी आधार लिंक करा

* ई-केवायसी पूर्ण करा

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा होणार आहे.

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या मदतीमुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची यंदाची होळी खऱ्या अर्थाने गोड ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tukadebandi Kayada : तुकडेबंदी हटली; आता १०-२० गुंठे जमीन विक्रीला परवानगी वाचा सविस्तर

अधिक वाचा : Pik Vima Yojana : खरीप गेला, रब्बी गेला… पण पीकविमा कुठे अडकला? वाचा सविस्तर

Web Title : सोयगाँव के किसानों को दो साल बाद मिली बाढ़ राहत निधि

Web Summary : सोयगाँव के किसानों के लिए खुशी की खबर, दो साल बाद ₹22 करोड़ की बाढ़ राहत राशि जमा। 24,328 किसानों को लाभ, पर 4,200 को अभी भी ई-केवाईसी के कारण इंतजार। अधिकारियों ने जल्द पूरा करने का आग्रह किया।

Web Title : Soygaon Farmers Receive Long-Awaited Flood Relief Funds After Two Years

Web Summary : Soygaon farmers celebrate as ₹22 crore flood relief deposited after two years. 24,328 farmers benefit, though 4,200 still await funds due to incomplete e-KYC. Authorities urge completion for disbursement.