Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > महाराष्ट्रातील 'या' नऊ जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषि योजना राबविण्यास मान्यता, वाचा योजनेचे स्वरूप 

महाराष्ट्रातील 'या' नऊ जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषि योजना राबविण्यास मान्यता, वाचा योजनेचे स्वरूप 

latest News Approval to implement Dhandhanya Krishi Yojana in nine districts of Maharashtra | महाराष्ट्रातील 'या' नऊ जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषि योजना राबविण्यास मान्यता, वाचा योजनेचे स्वरूप 

महाराष्ट्रातील 'या' नऊ जिल्ह्यांमध्ये धनधान्य कृषि योजना राबविण्यास मान्यता, वाचा योजनेचे स्वरूप 

Dhan Dhanya Krushi Yojana : या ९ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

Dhan Dhanya Krushi Yojana : या ९ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

Agriculture Scheme : महाराष्ट्रातील पालघर, यवतमाळ, गडचिरोली, धुळे, रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व बीड या ९ जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समित्या, त्याचबरोबर कार्यकक्षा नेमण्यात आल्या आहेत. 

केंद्र शासनाने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये कमी उत्पादनक्षमता, मध्यम पीक तीव्रता आणि सरासरी पेक्षा कमी कर्जवाटप असलेले देशातील शंभर आकांक्षित जिल्हे प्रधानमंत्री धनधान्य कृषि योजनेखाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समित्या गठीत करण्यात येत आहेत. 

जिल्हा धन धान्य कृषि योजनेची समितीची कार्यकक्षा 

  • योजनेंतर्गत निवडलेल्या प्रत्येक आकांक्षित कृषि जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृषी आणि संलग्न उपक्रमांचा सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करणे. सर्व सहभागी भागधारकांची बैठक आयोजित करून तयार केलेल्या जिल्हा कृति आराखडा हा क्रियाभिमुख (Action oriented) असल्याची खात्री करणे.
  • वार्षिक योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित करणे व आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी किमान एक मासिक बैठक आयोजित करणे. दर सहा महिन्यांच्या शेवटी, पतपुरवठ्याचे सार्वत्रिकरण, पीक तीव्रता आणि काढणीपश्चात मूल्यवर्धन या नियोजित लक्ष्यांकांचा सविस्तर आढावा घेणे.
  • सर्व संलग्न क्षेत्रांसह कृषी उत्पादकता आणि कर्जाच्या स्थितीचा आढावा घेणे,
  • सर्व विभागांची सांगड घालून जिल्ह्यामध्ये सर्वात मागे असलेले तालुके आणि गावांवर लक्ष केंद्रित करणे.
  • खासगी क्षेत्राला सहभागी करून घेऊन मोठ्या प्रमाणावर नाविन्यपूर्ण परिवर्तन सुलभ करणे.
  • नियोजनाव्यतिरिक्त नियमित आढावा घेऊन विविध घटकांची अंमलबजावणी करून नीती आयोगाच्या डॅशबोर्डवर वेळोवळी माहिती अद्ययावत करणे.
  • त्यानंतर राज्यस्तरावर समिती जिल्हा समितीचा अहवाल तपासून पुढील कार्यवाही करेल. 


योजनेसाठी निधीची व्यवस्था ; 
प्रस्तुत योजनेसाठी स्वतंत्रपणे निधी देण्यात येणार नसून विविध विभागांअंतर्गत (कृषि/मत्स्यव्यवसाय / पशुसंवर्धन / दुग्धव्यवसाय विकास/ सहकार / ग्रामविकास / जलसंपदा / कौशल्य विकास) असलेल्या विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे राबविली जाणार आहे.
सदर योजनेच्या क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणीचा तपशील ठरविण्याकरीता आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

Web Title : महाराष्ट्र के नौ जिलों में धन धान्य कृषि योजना को मंजूरी।

Web Summary : महाराष्ट्र ने नौ जिलों में धन धान्य कृषि योजना को मंजूरी दी। योजनाओं के अभिसरण के माध्यम से कृषि उत्पादकता को बढ़ावा देना। कार्यान्वयन के लिए समितियाँ गठित।

Web Title : Green light for Dhan Dhanya Krishi Yojana in nine Maharashtra districts.

Web Summary : Maharashtra approves Dhan Dhanya Krishi Yojana in nine districts to boost agricultural productivity through convergence of existing schemes. Committees formed for implementation.