Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर 

Agriculture News : कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर 

Latest News Approval of funds of Rs 2314 crore for agricultural development and agricultural development scheme, read in detail | Agriculture News : कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर 

Agriculture News : कृषी उन्नती, कृषी विकास योजनेसाठी २३१४ कोटींच्या निधीस मान्यता, वाचा सविस्तर 

Agriculture News : या दोन्ही योजना मिळून जवळपास २३१४ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त होणार आहे.  

Agriculture News : या दोन्ही योजना मिळून जवळपास २३१४ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त होणार आहे.  

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : केंद्र आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविधांगी योजना (Government Scheme) राबविल्या जातात. यासाठी भरीव निधीची तरतूद केली जाते. अशात केंद्र सरकारच्याकृषी उन्नती (Krushi Unnati Scheme) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी कार्यक्रमाच्या निधीस मान्यता मिळाली आहे. या दोन्ही योजना मिळून जवळपास २३१४ कोटी रुपयांचा निधी राज्याला प्राप्त होणार आहे.  

केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून कृषी उन्नती आणि राष्ट्रीय कृषी विकास राबविल्या जातात. देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ करणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्य योजना आणि जिल्हा कृषी योजना तयार करून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी निधी वाटप केला जातो. आता याच पार्श्वभूमीवर संबंधित कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. 

त्यानुसार केंद्र शासनाकडून महाराष्ट राज्यास कृषी उन्नती साठी रु.८३१.०४ कोटी आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी रु.१४६९.१० कोटी असे दोन्ही योजना मिळून रु.२३१४ कोटीच्या कार्यक्रमास मान्यता मिळाली आहे. गत वर्षी (२०२४ - २५) रु.१८९२.७३ कोटी निधी उपलब्ध झाला. त्या तुलनेत चालू वर्षी रु.२३१४ कोटी असा रु.४०७.४१ कोटी कार्यक्रमास वाढीव मान्यता मिळाली. लवकरच केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे .

काय आहेत या दोन्ही योजना 
कृषी उन्नती आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) या दोन्ही योजनांचा उद्देश शेती क्षेत्रात सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणे आहे. RKVY 2007 पासून सुरू झाली आणि तिचे उद्दिष्ट 4% वार्षिक वाढ साध्य करणे आहे, तर कृषी उन्नती योजना अधिक व्यापक आहे, ज्यामध्ये शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरणे, उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे समाविष्ट आहे. 
 

Web Title: Latest News Approval of funds of Rs 2314 crore for agricultural development and agricultural development scheme, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.