Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > फळबाग लागवड योजनेच्या 30 कोटींचा निधी वितरणास मान्यता, 'या' शेतकऱ्यांना अनुदान मिळणार 

फळबाग लागवड योजनेच्या 30 कोटींचा निधी वितरणास मान्यता, 'या' शेतकऱ्यांना अनुदान मिळणार 

Latest news Approval for distribution of Rs 30 crores for orchard cultivation scheme | फळबाग लागवड योजनेच्या 30 कोटींचा निधी वितरणास मान्यता, 'या' शेतकऱ्यांना अनुदान मिळणार 

फळबाग लागवड योजनेच्या 30 कोटींचा निधी वितरणास मान्यता, 'या' शेतकऱ्यांना अनुदान मिळणार 

Falbag Lagvad Yojana : सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा ३० कोटी निधी वितरीत करण्यात येणार आहे. 

Falbag Lagvad Yojana : सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा ३० कोटी निधी वितरीत करण्यात येणार आहे. 

Falbag Lagvad Yojana :    राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन २०२५-२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा ३० कोटी निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या निधीचे वितरण केले जाणार आहे. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे. या योजनेची सन २०२५-२०२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी १०४ कोटी ५० लाख निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

तर संबंधित निधीतून सुरुवातीला सन २०२३-२४ व सन २०२४-२५ मधील प्रलंबित दायित्व अदा करण्यात यावे. तद्नंतर उर्वरित निधी सन २०२५-२६ मधील कार्यक्रम राबविण्यासाठी दिलेल्या प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात यावा.

दरम्यान संचालक (फलोत्पादन) यांनी निधी वितरणाकरीता प्रस्ताव सादर केले आहेत. त्यास अनुलक्षून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषि आयुक्तालयास वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार सन २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा ३० कोटी निधी वितरीत करण्यात येणार आहे. 

 

नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला किती लिटर रॉकेल मिळणार, वाचा जिल्हाधिकारी काय म्हणाले?

 

Web Title : फलबाग योजना के लिए ₹30 करोड़ स्वीकृत; किसानों को सब्सिडी

Web Summary : भाऊसाहेब फुंडकर फलबाग योजना के लिए ₹30 करोड़ आवंटित, मनरेगा योजना के लिए अयोग्य किसानों को लाभ। धनराशि से 2023-25 के लंबित बकाया और 2025-26 कार्यक्रम को समर्थन, कृषि आयुक्त द्वारा वितरित।

Web Title : ₹30 Crore Approved for Orchard Farming Scheme; Subsidy for Farmers

Web Summary : ₹30 crore has been allocated for the Bhausaheb Phundkar Orchard Farming Scheme, benefiting farmers ineligible for the MGNREGA scheme. Funds will clear pending dues from 2023-25 and support the 2025-26 program, distributed by the Agriculture Commissioner.