Shetkari Apghat Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले दावे निकालात काढण्यासाठी ३१.८१ कोटी इतका निधी, आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या वर्षातील जुलै २०२५ ते सप्टें २०२५ या कालावधीतील प्रस्तुत योजनेंतर्गत क्षेत्रिय स्तरावरुन प्राप्त झालेले व छाननीअंती तालुकास्तरीय समितीच्या शिफारशीने मंजूर झालेले एकूण १६२३ (१५८८ मृत्यू + ३४ अपंगत्व) प्रस्ताव निकाली काढण्यासाठी ३२.१४ कोटी इतक्या निधीची मागणी केली आहे.
त्या अनुषंगाने योजनेच्या लेखाशीर्षाखाली शिल्लक असलेला निधी विचारात घेता, प्रस्तुत योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षातील जुलै २०२५ ते सप्टें २०२५ या कालावधीतील मंजूर प्रस्तावांकरीता ३१.८१ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सन २०२४-२५ या वर्षातील ३०५० मंजूर प्रस्तावांना ६०.३५ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच प्रस्तुत योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षातील १४०३ मंजूर प्रस्तावांकरीता रक्कम २७.८४ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
अशाप्रकारे प्रस्तुत योजनेंतर्गत एकूण मंजूर तरतूद १२० कोटी पैकी एकूण ८८.१९ कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला असून योजनेच्या लेखाशीर्षाखाली ३१.८१ कोटी इतका निधी शिल्लक होता. तो आता वितरित केला जाणार आहे.
