Agriculture Scheme : शेततळी बांधण्यासाठी निधी नसल्याचे विधानसभेत एका लक्षवेधीच्या माध्यमातून समोर आले होते. आता लागलीच एका शासन निर्णयाद्वारे शेततळे लाभार्थ्यांना निधी वितरित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवरच संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना महाडिबिटीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. शेततळे घटकांसाठी मे व जून महिन्यात सोडत काढलेली होती तर त्या वेळी निवड झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज हे शेतकरी स्तरावर आज देखील प्रलंबित आहेत.
तरी, जे शेतकरी आता शेततळे खोदण्यास इच्छुक असतील, अशा निवड झालेल्या लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करून पुढील प्रक्रियेत सहभागी व्हावे, अन्यथा आपले अर्ज हे दिनांक ३१ डिसेंबरनंतर रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राध्यान्य देण्यात येईल.
