- इंद्रपाल कटकवार
पारंपरिक पद्धतीने तणस जाळण्याऐवजी शासकीय आर्थिक मदत घेऊन त्या तणसावर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया उद्योग सुरू झाले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तणस हा एक फायदेशीर असा 'शेतीपूरक व्यवसाय' ठरू शकतो.
भंडारा हा महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्हा. सुमारे दोन लाख ७० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. भात पिकाच्या कापणीनंतर शेतात उरलेले 'तणस' शेतकरी केवळ पशुधनाच्या चाऱ्यासाठी आणि थोड्याफार प्रमाणात खतासाठी वापर करतो.
जिल्ह्यात तणसावर आधारित प्रक्रिया उद्योगाचा अभाव आणि घटते पशुधन यामुळे दरवर्षी शेतातील लाखो टन वजनाचे तणसाचे ढीग शेतकऱ्यांकडून हंगामापूर्वी कचरा म्हणून नष्ट केले जातात. कृषी व आर्थिक विकासाची संधी म्हणून याकडे बघणे आवश्यक आहे. तणसाचा उपयोग कागद व कार्डबोर्ड उद्योगासाठी वापर होतो. त्यासाठी तणसापासून सेंद्रिय 'पल्प' तयार करण्याचा उद्योग उभारता येऊ शकतो.
भाताच्या तणसाच्या कांड्यांपासून पशुखाद्य निर्मिती उद्योग निर्माण होऊ शकतो. तणसाचा उपयोग कॉम्प्रेस हार्ड बोर्ड, पार्टिकल बोर्ड आणि सेंद्रिय इन्सुलेशन साहित्य तयार करण्यासाठी आणि बांधकामातसुद्धा उपयोग होतो. भाताच्या कांडांपासून मशरूम उत्पादनासाठी योग्य माध्यम तयार करता येतो. हा एक फायदेशीर व कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे.
आर्थिक व तांत्रिक साहाय्य
तणमावर आधारित उद्योग धंद्यासाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. तणसापासून सूक्ष्म खाद्य उत्पादने तयार करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म बाड़ा उन्नयन योजना असून, याद्वारे शासनाकडून उद्योगांना आर्थिक व तांत्रिक साहाय्य प्रदान केले जाते. तष्णसावर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी प्रधानमंत्री सृजन कार्यक्रमाद्वारे वित्तीय साहाय्य दिले जाते.
अन्य मंडळांना मदत
तणसापासून कागद, हस्तकला च इतर उत्पादनासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ मदत करते. तणसापासून अन्न उत्पादने तयार करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय आर्थिक, तांत्रिक व परवानासाठी मदत करते. राष्ट्रीय बायोगॅस मिशन अंतर्गत तप्णसाचा वापर करून ऊर्जा उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांना वित्तीय साहाय्य केले जाते.
बायोमास प्लांटमध्ये वापर
तणसाचा उपयोग प्लास्टिकला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक बायोडिझोल प्लेट्स, कप आणि पेंकिग मटेरियल तयार करता येऊ शकतो. तणस जळल्यानंतर मिळणाऱ्या राखेचा सिमेंट, वीट आणि बांधकाम साहित्य निर्मितीमध्येसुद्धा उपयोग आहे. भाताच्या तणसापासून टोपल्या, मडके आणि शोभेच्या वस्तू तयार करता येऊ शकतात. ऊर्जा उत्पादनामध्ये बायोमास प्लांटमध्ये तणसाचा वापर केला जातो.
इथेनॉल प्रकल्पाचे काय झाले?
२०१२ मध्ये जिल्ह्यात १५०० कोटी रुपये खर्चाचे १०० एकर जमिनीवर तणसापासून इथेनॉल व बायोगॅस निर्मिती प्रकल्प तयार होणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्यापही सदर नाहीत. याला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत की प्रकल्प निर्मितीचाबत जिल्ह्यात कुठल्याही हालचाली झाल्या अन्य कारणा, ही बाबही अधांतरीत आहे.
हेही वाचा : पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील 'या' भागात पावसासह गारपिटीची शक्यता, वाचा हवामान अंदाज
